मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shrigonda Suicide : कर्जावर तब्बल ४० टक्के व्याज; व्यापाऱ्याच्या आत्महत्येनंतर १५ सावकारांवर गुन्हा

Shrigonda Suicide : कर्जावर तब्बल ४० टक्के व्याज; व्यापाऱ्याच्या आत्महत्येनंतर १५ सावकारांवर गुन्हा

Aug 13, 2022, 09:58 AM IST

    • Shrigoda Crime News : काही दिवसांपूर्वी शहरातील १५ सावकारांनी एका व्यापाऱ्याचा कर्जवसूलीसाठी छळ केला होता. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली होती, आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.
Shrigoda Crime News (HT_PRINT)

Shrigoda Crime News : काही दिवसांपूर्वी शहरातील १५ सावकारांनी एका व्यापाऱ्याचा कर्जवसूलीसाठी छळ केला होता. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली होती, आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.

    • Shrigoda Crime News : काही दिवसांपूर्वी शहरातील १५ सावकारांनी एका व्यापाऱ्याचा कर्जवसूलीसाठी छळ केला होता. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली होती, आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे.

Ahamadnagar Crime News : व्यापाऱ्याला दिलेलं कर्ज तो परत देण्यास विलंब करत असल्यानं श्रीगोंद्यातील १५ सावकारांनी त्याचा छळ करायला सुरुवात केली होती. परिणामी पैसेच नसल्यानं नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या व्यापाऱ्यानं आत्महत्या केली. त्यामुळं आता या प्रकरणात पोलिसांनी श्रीगोंदा शहरातील १५ सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला असून यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

नेमकं काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील 'शिवराम वडेवाले' या दुकानाचे मालक आणि व्यापारी शिवराम रमेश वहाडणे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील सावकारांकडून कर्ज घेतलं होतं. परंतु त्यानंतर सावकारांनी कर्जाच्या व्याजाचा टक्का तब्बल १० ते ४० टक्क्यांनी वाढवल्यानं शिवराम यांना ते परत देणं शक्य नव्हतं, याशिवाय सावकारांनी त्यांना कर्ज व्याजासह परत देण्यासाठी छळवणूक करायला सुरुवात केली होती. त्यामुळं या सर्व प्रकाराला कंटाळून गेल्या आठवड्यात शिवराम वहाडणे यांनी आत्महत्या केली होती. परंतु झालेल्या या सर्व प्रकाराविरोधात त्यांची पत्नी वंदना वहाडणे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी वहाडणे यांच्या हिशोबाच्या वह्या तसापल्यानंतर सावकारांच्या जाचातून त्यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

त्यामुळं आता या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी शहरातील सावकार जयसिंग म्हस्के, शहाजी झुंजरुक, कांतीलाल कोकाटे, बापू चव्हाण, अक्षय कैतके, राहुल धोत्रे, भास्कर सांगळे, प्रवीण जाधव, धीरज भोसले, आकाश भोसले, राहुल खामकर, संतोष शिंदे, विनोद घोडके, मुन्ना काळे आणि राजू बोरुडे या १५ सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

बेकायदा कर्जवाटप करून कर्ज दिलेल्या व्यक्तींकडून अव्वाच्या सव्वा दरानं कर्ज वसूल करणाऱ्या सावकारांविरुद्ध राज्यात सावकारी कायदा लागू करण्यात आलेला आहे. याशिवाय ज्या सावकारांना कर्जवाटपाची परवानगी देण्यात आली आहे, त्यांनाही त्यासंदर्भात काही नियम आखून देण्यात आलेले आहेत. परंतु आता सावकारी कायद्याची तमा न बाळगता १५ सावकारांच्या छळामुळं एका व्यापाऱ्याचा जीव गेल्यानं श्रीगोंदा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या