मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 13 August 2022 Live: Pune : खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला; १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडणे सुरू
खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

Marathi News 13 August 2022 Live: Pune : खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला; १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडणे सुरू

Aug 13, 2022, 10:30 PMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Aug 13, 2022, 10:30 PMIST

पवना धरणातून ५ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरू

पवना धरणातुन शनिवारी रात्री ९ वाजता पाण्याचा विसर्ग वाढवून ५ हजार ५०० क्यूसेक करण्यात आला. यामुळे नदी किनाऱ्यावरील गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. पाणलाेट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातुन साेडण्यात येणारा विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Aug 13, 2022, 09:17 PMIST

Pune : खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला; १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सकाळी १० वाजता १८ हजार ४९१ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी केले आहे.

<p>खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला&nbsp;</p>
खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला&nbsp;

Aug 13, 2022, 07:56 PMIST

चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि सत्यजित रे यांची जन्मशताब्दी असे दुहेरी औचित्य साधून बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि फिल्मसिटीचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

Aug 13, 2022, 07:14 PMIST

देश हुकुमशाही कडे जात असेल तर व्यंगचित्रकाराने चित्रातून फटके मारायलाच हवे; उद्धव ठाकरे

आज देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. पण या अमृत महोत्सवी वर्षात हा हुकुमशाही कडे जात आहे. अशा वेळी व्यंग चित्रकारने आपल्या ब्रशरूपी हत्याराने या परिस्तितीवर फटके मारावे असे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्मिकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले आहेत.

Aug 13, 2022, 03:16 PMIST

CM Eknath Shinde : कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवारांना अटक!

CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावेळी घोषणाबाजी आणि आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यााधीही पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांची धरपकड केली होती.

Aug 13, 2022, 02:37 PMIST

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबईत रुग्णालयात मानवी साखळी

मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरा रोडतर्फे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी तयार करून एकतेचा संदेश दिला. यानिमित्ताने रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

<p>स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मानवी साखळी</p>
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मानवी साखळी

Aug 13, 2022, 02:09 PMIST

CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड!

CM Eknath Shinde In Kolhapur : राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते यावेळी दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार असून आमदार अनिल बाबर यांच्या घरीही भेट देणार आहेत. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरात आले असता त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय ज्या शिवसैनिकांनी निदर्शनं करण्याची योजना आखली आहे, त्यांचीही पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

Aug 13, 2022, 01:27 PMIST

Amit Thackeray : गृहमंत्रीपद दिलं तरी मी सत्तेत सहभागी होणार नाही; अमित ठाकरेंचं स्पष्टीकरण!

Amit Thackeray In Pune : मनसे नेते अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असून त्यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर आणि गृहमंत्रीपदाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. ते पुण्यात बोलताना म्हणाले की, संजय राऊत रोज पत्रकार परिषदा घेत होते, अनेकांना सगळं पुरवत होते, आता मात्र ते तुरुंगात असून मला संजय राऊत समजू नका, असा टोला मनसे नेते अमित ठाकरेंनी शिवसेनेला लगावला आहे. मी गृहमंत्री होणार, ही अफवा होती, मला वीस दिवस पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारले, ती बातमी खोटी होती, हे सांगून मी थकलो असून मुख्यमंत्री शिंदेंनी गृहमंत्रीपद दिलं तरी मी सत्तेत सहभागी होणार नसल्याचं अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Aug 13, 2022, 01:16 PMIST

Uddhav Thackeray: साप्ताहिक मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार

साप्ताहिक 'मार्मिक' च्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर ते काय बोलतात याबद्दल उत्सुकता आहे.

Aug 13, 2022, 12:59 PMIST

Sonia Gandhi: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा करोनाची लागण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सरकारच्या नियमानुसार त्या विलगीकरणात राहणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अलीकडंच सोनिया गांधी यांची ईडी चौकशी करण्यात आली होती.

Aug 13, 2022, 12:09 PMIST

Sanjay Shirsat: माझ्या मंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ घेतील; संजय शिरसाट मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम

मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी बरीच चर्चा झाली होती. शिंदे साहेबांनी प्रत्येकाशी चर्चा केली होती. मी राजकारणात आहे. संधी मिळावी असं मला वाटतं. ती मिळाली नाही म्हणून मी नाराज असेल तर ती नाराजी चेहऱ्यावर दिसणारच, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ‘मला मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय वरिष्ठ घेतील,’ असं शिरसाट म्हणाले.

Aug 13, 2022, 11:48 AMIST

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी केलं चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक

चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी आजवर प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. प्रदेशाध्यक्ष पदालाही ते न्याय देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Aug 13, 2022, 11:18 AMIST

Uttar Pradesh : यूपीच्या बांदामध्ये बोट उलटली; २४ तासांच्या शोधकार्यानंतर ११ जणांचे मृतहेद सापडले!

Uttar Pradesh Flood News : काल दुपारी उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातल्या बांदामध्ये बोट उलटली होती. त्यानंतर NDRF आणि जिल्हा प्रशासनानं बेपत्ता लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. परंतु आता या दुर्घटनेत ११ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचा काम सुरू असून इतर बेपत्ता लोकांचाही शोध घेण्यात येत आहे.

Aug 13, 2022, 10:56 AMIST

Chandrapur Accident: चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर ट्रक-जीपची धडक; चार जण जागीच ठार

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली- गडचिरोली मार्गावर बोलेरो जीप ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे (वय २६) याचा समावेश आहे.

Aug 13, 2022, 10:35 AMIST

श्रीदेवी यांच्या जयंतीला जान्हवी कपूर झाली भावुक, शेअर केला आईसोबतचा फोटो

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जयंतीनिमित्त त्यांची मुलगी जान्हवी कपूरने त्यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये, श्रीदेवी चिमुकल्या जान्हवीला मिठी मारताना दिसत आहेत. जान्हवीचा पहिला चित्रपट 'धडक' रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वी २०१८ मध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं.

<p>shridevi with janhvi kapoor</p>
shridevi with janhvi kapoor

Aug 13, 2022, 09:34 AMIST

MP Sanjay Raut : सुनिल राऊतांनी घेतली संजय राऊतांची तुरुंगात भेट

MP Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आज त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी भेट घेतली आहे. यावेळी संजय राऊतांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती आहे, याशिवाय राऊत हे तुरुंगात दैनंदिन बातम्या वाचत असून ग्रंथालयातील पुस्तकांचंही वाचन करत असल्याचीही माहिती आहे.

Aug 13, 2022, 09:03 AMIST

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे आज सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर; पूरस्थितीचा घेणार आढावा!

CM Eknath Shinde In Sangali and Kolhapur : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहे. या दौऱ्यावेळी शिंदे हे आमदार अनिल बाबर यांच्या घरी भेटही देणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १३६०० रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.

Aug 13, 2022, 08:25 AMIST

Kanrnataka Govt : सरकारी नोकरीसाठी तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं; कॉंग्रेस आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

MLA Priyank Kharge allege : कर्नाटकातील सरकारवर कॉंग्रेसच्या एका आमदारानं धक्कादायक आरोप केले आहेत. कर्नाटक काँग्रेसचे आमदार प्रियांक खरगे यांनी भाजपला लक्ष्य करताना वादग्रस्त विधान केलं आहे, कर्नाटकातील सरकार अत्यंत भ्रष्ट असून राज्यात महिलेला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तिला आधी काही व्यक्तीसोबत झोपावं लागतं, असा गंभीर आणि धक्कादायक आरोप खरगे यांनी कर्नाटक सरकारवर केला आहे.

Aug 13, 2022, 08:16 AMIST

Sanjay Shirsat : ठाकरे हेच कुटुंबप्रमुख; मंत्रिपद न मिळाल्यानं शिरसाटांचा CM शिंदेंना इशारा?

Sanjay Shirsat Tweet : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर करत उद्धव ठाकरे हेच कुटुंबप्रमुख असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता शिंदे गटात मंत्रिपदावरून सुरू असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

    शेअर करा