मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'सेनेतून कुणाला काढायचं अन् ठेवायचं ठरवा, सुरुवात…', सरनाईकांचा VIDEO VIRAL

'सेनेतून कुणाला काढायचं अन् ठेवायचं ठरवा, सुरुवात…', सरनाईकांचा VIDEO VIRAL

Jun 23, 2022, 08:47 AM IST

    • गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्यावर प्रतोदपदाची जबाबदारी सोपवली. यावेळचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्यावर प्रतोदपदाची जबाबदारी सोपवली. यावेळचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    • गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्यावर प्रतोदपदाची जबाबदारी सोपवली. यावेळचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह इतर नेत्यांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्ह करतही आवाहन केलं. मात्र यानंतरही एकनाथ शिंदे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून हिदुत्व फॉरेव्हर असं म्हणत त्यांनी चार मुद्दे उपस्थित केले. आता शिवसेनेचे आणखी काही आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. यातच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांना बुधवारी व्हीप बजावला होता. वर्षा बंगल्यावर बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण एकनाथ शिंदे यांच्या गटाने आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याचं म्हणत सुनील प्रभूंनाच प्रतोद पदावरून काढून टाकलं. त्यानंतर महाडचे आमदार भरत गोगावले यांना प्रतोद करण्यात आलं.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना प्रतोदपदी नियुक्त केल्यानंतर प्रताप सरनाईक बोलताना दिसत आहेत. ते यांनी गोगावलेंना म्हणतात की, "तुमची जबाबदारी वाढलीय. आता पक्षात कोणाला ठेवायचं, काढायचं तुम्ही ठरवा. सुरुवात सुनील प्रभू यांच्यापासून करा." प्रताप सरनाईक हे भरत गोगावले यांना प्रतोदाची जबाबदारी काय असते, त्याने कसे काम करावे हे सांगताना दिसतात.

प्रताप सरनाईक गोगावलेंना म्हणाले की, 'आता हे प्रतोदाचं काम काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना? आता तुमची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना पक्षाची फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्व आमदारांना टिकवून ठेवा, त्यांना बोलायला द्या', त्यावर भरत गोगावले यांनी, ' हो, सगळं व्यवस्थित करतो', असे म्हटले. तेव्हा शेजारी असलेले आमदार संजय शिरसाट यांनी, 'केलंच पाहिजे सगळं व्यवस्थित, मागच्या प्रतोदासारखं करु नका', असं म्हटलं. यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले की, ' मागचे प्रतोद मुंबईच्याच लोकांना जास्त बोलायला द्यायचे. तुम्ही आता प्रतोद आहात, पक्षात कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे आता तुम्ही ठरवा. सुरुवात सुनील प्रभू यांच्यापासून करा.'

पुढील बातम्या