मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kishori Pednekar: संजय राऊतांनंतर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, सोमय्यांच्या आरोपानंतर चौकशी सुरू

Kishori Pednekar: संजय राऊतांनंतर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, सोमय्यांच्या आरोपानंतर चौकशी सुरू

Oct 28, 2022, 11:50 PM IST

  • शिवसेना नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसआरए घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली.

किशोरी पेडणेकर

शिवसेना नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसआरए घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली.

  • शिवसेना नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसआरए घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली.

शिवसेना नेते संजय राऊत पत्राचाळ प्रकरणी ऑर्थर रोड जेलमधून आहेत. दरम्यान राऊत यांच्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. एसआरए (SRA scam) घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर दादर पोलिसांनी पेडणेकरांची चौकशी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

दादर पोलिसांनी उद्या (शनिवार) पुन्हा एकदा पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावलं आहे. याबाबतचा  समन्सही बजावला आहे. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एसआरए घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती. या गुन्ह्यांत आतापर्यंत किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं. मात्र, किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकरांची चौकशी केली आहे. त्यामुळे येत्या काळात पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच यासंदर्भात एक ट्वीटही केलं होतं. भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो,पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये सहा गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की त्यांनी सदनिकांचा ताबा घ्यावा,असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

 

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या