मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो, पोस्ट व्हायरल केल्याने BJP आक्रमक

Narayan Rane : २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो, पोस्ट व्हायरल केल्याने BJP आक्रमक

Oct 28, 2022, 11:17 PM IST

    • देशात सध्या नोटांवर कोणाचा फोटो छापायचा यावरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान आज २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो छापला गेल्याने कोकणातील भाजप कार्यकर्ते व राणे समर्थक आक्रमक झाले आहेत.
२५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो

देशात सध्या नोटांवर कोणाचा फोटो छापायचा यावरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान आज २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो छापला गेल्याने कोकणातील भाजप कार्यकर्ते व राणे समर्थक आक्रमक झाले आहेत.

    • देशात सध्या नोटांवर कोणाचा फोटो छापायचा यावरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान आज २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो छापला गेल्याने कोकणातील भाजप कार्यकर्ते व राणे समर्थक आक्रमक झाले आहेत.

सिंधुदुर्ग – सध्या भारतातील नोटांवर कोणाचा फोटो छापावा, यावरून राजकीय नेत्यांमध्ये अहमिका सुरू आहे. भारतातील चलनी नोटांवर इंडोनेशिया देशाच्या धर्तीवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला. केजरीवालांच्या या मागणीनंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो नोटांवर असावेत अशी मागणी केली. त्यामध्ये शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ते मोदींपर्यंतच्या नेत्यांचे फोटो छापण्याची मागणी करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावून सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. या प्रकरणी कोकणातील भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थक आक्रमक झाले असून याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

पोलीस ठाण्यात दिलेले निवेदन

नारायण राणेंचा फोटो अशोक स्तंभाच्या जागी लावून अशोक स्तंभाची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या