मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे सरकारचा महाआघाडीला धक्का; १५ नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ

शिंदे सरकारचा महाआघाडीला धक्का; १५ नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ

Oct 29, 2022, 09:17 AM IST

    • राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाआघाडीला पुन्हा एक धक्का देत महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
१५ नेत्यांची सुरक्षा घेतली काढून

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाआघाडीला पुन्हा एक धक्का देत महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

    • राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाआघाडीला पुन्हा एक धक्का देत महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के दिले जात आहे. आता शिंदे सरकारने पुन्हा एकदा झटका देत महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यामध्ये जयंत पाटील, नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यासारखे बडे नेते सामील आहेत. विशेष म्हणजे मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही कायम ठेवल्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

शिंदे सरकारने महत्वाच्या विरोधी नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्याने नवा वादाला तोंड फुटले आहे. जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांनी आशिष शेलार यांची  साथ दिली होती. त्यामुळे राज्यात नव्या काही राजकीय समीकरणाची जुळवाजुळव होत आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हाही चर्चेचा विषय आहे. नार्वेकर यांना आधी एक्स कॅटेगरीची सुरक्षा होती. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. 

शिंदे सरकारच्या या निर्णायामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यात शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली होती. यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच आता महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. 

महाआघाडीच्या खालील नेत्यांची काढली सुरक्षा -

  • बाळासाहेब थोरात
  • जयंत पाटील
  • वरुण सरदेसाई
  • धनंजय मुंडे
  • भास्कर जाधव
  • छगन भुजबळ
  • नितीन राऊत
  • नाना पटोले
  • जयंत पाटील
  • सतेज पाटील
  • संजय राऊत
  • विजय वडेट्टीवार
  • नवाब मलिक
  • नरहरी झिरवळ
  • सुनील केदार
  • डेलकर परिवार

 

शिंदे सरकारकडून सुरक्षा काढून घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, कुणाला सुरक्षा देणं, न देणं ही जबाबदारी सरकारची आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये याची काळजी सरकारने घ्यावी. सरकारने आमची सुरक्षा कमी केली, त्याला विरोध करण्याचं आमचं कारण नाही. सरकारला वाटतेय की आम्हाला सुरक्षा द्यायची गरज नाही, तर आम्हाला काहीही अडचण नाही. 

पुढील बातम्या