मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : ‘एकनाथ शिंदे भाजपचे कळसूत्री बाहुले, प्रकल्प गेला आणि ते दाढीची खुंटं उपटत राहिले’

Shiv Sena : ‘एकनाथ शिंदे भाजपचे कळसूत्री बाहुले, प्रकल्प गेला आणि ते दाढीची खुंटं उपटत राहिले’

Sep 15, 2022, 11:06 AM IST

    • Shiv Sena vs BJP On Vedanta Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये हलवण्यात आल्यामुळं राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता शिवसेनेनं सामनातून भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
Shiv Sena vs BJP On Vedanta Foxconn Semiconductor Project (HT)

Shiv Sena vs BJP On Vedanta Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये हलवण्यात आल्यामुळं राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता शिवसेनेनं सामनातून भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

    • Shiv Sena vs BJP On Vedanta Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये हलवण्यात आल्यामुळं राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता शिवसेनेनं सामनातून भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

Shiv Sena vs BJP On Vedanta Foxconn Semiconductor Project : पुण्यातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर आता राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली असून आता त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. परंतु आता शिवसेनेनं याच मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्यासाठीच भाजपनं एकनाथ शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. शिवसेनेनं मराठी माणसांचा अपमान केल्याचा आरोप शिंदेंनी पैठणमधील सभेत केला होता. परंतु वेदांता-फॉक्सकॉन सारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ दाढीची खुंटं उपटत बसल्यानंच मराठी माणसांचं मोठं नुकसान झालं आहे. जर शिवसेनाच नसती तर आजचे मुख्यमंत्री कुठे असते?, असा सवाल करत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट तर गेला, उद्या हे याच पद्धतीनं मुंबईचा सौदा करतील, महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पहिल्या पसंतीचं राज्य आहे. तरीदेखील प्रकल्प राज्याबाहेर गेला?, पुण्यातील तळेगावमध्ये या प्रकल्पासाठी ११०० एकर जागा देण्याचं मविआ सरकारनं मान्य केलं होतं. परंतु राज्यात बेकायदा सरकार स्थापन होताच एक लाख तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असलेला प्रकल्प गुजरातला वळवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपवर केला आहे.

याआधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असंच गुजरातनं पळवून नेलं होतं. आता फॉक्सकॉन प्रकल्प गेला. त्याचं खापर आता मुख्यमंत्री शिंदेंनी मविआ सरकारवर फोडलं, मात्र हेच शिंदे मागच्या सरकारमध्ये अडीच वर्ष मंत्री होते. तेव्हा ते काय खोक्यांचे ओझे वाहण्यात व्यस्त होते का?, इतका मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतरही त्यांनी त्याविरोधात ब्र काढला नाही, हा शिवसेनेचा आरोप नसून खात्रीच आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप मुंबईचा सौदा करायला निघाल्याची खोचक टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

पुढील बातम्या