मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dilip Lande: शिवसेनेत किती आमदार उरले?; दिलीप लांडे सुद्धा गुवाहाटीत पोहोचले!

Dilip Lande: शिवसेनेत किती आमदार उरले?; दिलीप लांडे सुद्धा गुवाहाटीत पोहोचले!

Jun 24, 2022, 02:08 PM IST

    • Eknath Shinde Vs Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात पुकारलेल्या बंडाला दिवसेंदिवस बळ मिळत आहे. मुंबईतील आमदार दिलीप लांडे हे देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.
Dilip Lande

Eknath Shinde Vs Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात पुकारलेल्या बंडाला दिवसेंदिवस बळ मिळत आहे. मुंबईतील आमदार दिलीप लांडे हे देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.

    • Eknath Shinde Vs Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात पुकारलेल्या बंडाला दिवसेंदिवस बळ मिळत आहे. मुंबईतील आमदार दिलीप लांडे हे देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.

Dilip Lande Joins Eknath Shinde Camp: भाजपसोबत सरकार स्थापनेची अट घालत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात पुकारलेल्या बंडाला दिवसागणिक बळ मिळत आहे. रोजच्या रोज कोणी ना कोणी आमदार शिंदे गटाला पाठिंबा देत आहे. मुंबईतील एक आमदार दिलीप लांडे यांनी देखील आज निष्ठा बदलत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. ते गुवाहाटीत पोहोचले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे २० ते २५ आमदार त्यांच्यासोबत सुरतला पोहोचल्याचं बोललं जात होतं. हा आकडा हळूहळू वाढत गेला. शिंदे हे सुरतच्या हॉटेलमध्ये बसून शिवसेना नेतृत्वाशी वाटाघाटी करत असताना मुंबईतील काही आमदार व मंत्री 'वर्षा' निवासस्थानी होते. त्यामुळं ते शिवसेनेतच असल्याचं मानलं जात होतं. मात्र, कालांतरानं चित्र बदलत गेलं. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह एकेक आमदार मुंबई सोडू लागला व शिंदे गटात सहभागी झाला. मुंबईतील दादर येथील आमदार सदा सरवणकर हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले. त्यानंतर आता चांदिवली मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे हे देखील गुवाहाटीत पोहोचले आहेत.

मूळचे शिवसैनिक असलेले दिलीप लांडे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. मनसेमध्ये जाऊन ते नगरसेवकही झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसेच्या काही नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळं २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. माजी मंत्री व काँग्रेसचे वजनदार नेते नसीम खान यांना मात देऊन ते निवडून आले. कालपर्यंत ते मुंबईतच होते. शिवसेनेनं बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली होती. मात्र, आज अचानक चक्रे फिरली आणि गुवाहाटीत पोहोचले आहेत. मुंबईतील आमदारांनी पक्षाकडं पाठ फिरवणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या