मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: पॉवर प्ले सुरू! शरद पवार यांनी घेतली संपूर्ण सूत्रे हाती

Sharad Pawar: पॉवर प्ले सुरू! शरद पवार यांनी घेतली संपूर्ण सूत्रे हाती

Jun 24, 2022, 01:37 PM IST

    • Sharad Pawar in Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील बंड निष्प्रभ करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच आता मैदानात उतरले आहेत.
Sharad Pawar

Sharad Pawar in Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील बंड निष्प्रभ करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच आता मैदानात उतरले आहेत.

    • Sharad Pawar in Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील बंड निष्प्रभ करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच आता मैदानात उतरले आहेत.

Sharad Pawar for Maha Vikas Aghadi: एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर महाविकास आघाडी सरकारपुढं संकट उभं ठाकलं आहे. शिवसेनेनं हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही बंडखोर माघार घेत नसून त्यांनी सरकार उलथवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळं आतापर्यंत केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरकार वाचवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. (Maharashtra Political Crisis)

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याचं समजतं. बैठकीनंतर बोलताना संजय राऊत यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत होता. 'महाविकास आघाडी सरकार वाचवण्याची पुढची रणनीती शरद पवार यांची असेल. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल व पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही हार मानणार नाही. आम्ही जिंकू. विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करू, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची बातमी आल्यानंतर हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे. पक्षाचे प्रमुख व नेते हा प्रश्न हाताळतील. शिवसेनेतून कोणीही मुख्यमंत्री झाल्यास आमची हरकत नाही. मात्र, त्याचा निर्णय झाल्यावरच आम्ही त्यावर बोलू, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. मात्र, हे बंड यशस्वी होत असल्याचं दिसू लागताच काँग्रेस व राष्ट्रवादीला सरकारच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. त्यानंतर शरद पवार यांनी ट्रॅक बदलला. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या बंडामागे भाजप असल्याचा थेट आरोप केला. त्यातून त्यांनी सक्रिय होण्याचे संकेत दिलेच होते. त्यानंतर आज तातडीची बैठक घेण्यात आली. 

शरद पवार हे गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात आहेत. राजकीय संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. अशी अनेक संकटं त्यांनी हातळली आहेत. त्यामुळं शिवसेनेतील बंड मोडित काढण्यासाठी पवार नेमकं काय करणार याकडं आता लक्ष लागलं आहे.

पुढील बातम्या