मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Shirsat : गडाखांना मंत्रिपद देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खोके घेतले; शिंदे गटाचा खळबळजनक आरोप

Sanjay Shirsat : गडाखांना मंत्रिपद देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खोके घेतले; शिंदे गटाचा खळबळजनक आरोप

Apr 02, 2023, 03:33 PM IST

    • Sanjay Shirsat : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या अपक्ष आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं होतं, थेट त्यांची नावं घेत शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray (HT)

Sanjay Shirsat : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या अपक्ष आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं होतं, थेट त्यांची नावं घेत शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

    • Sanjay Shirsat : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या अपक्ष आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं होतं, थेट त्यांची नावं घेत शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची पहिली सभा आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. त्यापूर्वीच आता ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट उद्धव ठाकरेंवर खोके घेतल्याचा आरोप करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. नेवाश्याचे आमदार शंकरराव गडाख यांना मंत्रिपद देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खोके घेतल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या पाहिली तर बहुमत पूर्ण झालं होतं. परंतु त्या काळात शिवसेनेतील अनेक जेष्ठ आमदारांना डावलून तीन अपक्ष आमदारांना मंत्रिपदं देण्यात आली. उद्धव ठाकरेंनी आजच्या संभाजीनगर येथील सभेत देवाची अर्थात बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगावं की, त्यांनी आमदार शंकरराव गडाख यांना मंत्रिपद का दिलं?, त्यांना मंत्रिपद देण्यासाठी किती खोके घेतले?, ते शिवसेनेच्या कोट्यातून आमदार असताना त्यांनी पक्षाच्या एकाही बैठकीला का हजेरी लावली नाही?, मग असं असताना उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्यावर मेहेरबानी का दाखवली होती?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर खोके घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मविआच्या स्टेजवर आंबेडकर का नाही- शिरसाट

उद्धव ठाकरेंनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली. परंतु छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते स्टेजवर कुठेही नाहीयेत. केवळ गरज असेल म्हणून एखाद्याला वापरून घ्यायचं, असाच प्रयत्न ठाकरेंचा दिसत असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीची आजची सभा ही हतबल सभा असून बाळासाहेब ज्यांच्याविरोधात लढले तेच लोक व्यासपीठाची पाहणी करत असल्याचं सांगत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला हाणला आहे.

पुढील बातम्या