मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Shirsat: ठाकरेंबद्दलचं ट्वीट हा मोबाइलचा टेक्निकल प्रॉब्लेम; शिरसाट यांचा खुलासाही धक्कादायक

Sanjay Shirsat: ठाकरेंबद्दलचं ट्वीट हा मोबाइलचा टेक्निकल प्रॉब्लेम; शिरसाट यांचा खुलासाही धक्कादायक

Aug 13, 2022, 10:37 AM IST

    • Sanjay Shirsat on tweet Praising Uddhav Thackeray: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक करणाऱ्या ट्वीटवर संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे.
Uddhav Thackeray - Sanjay Shirsat

Sanjay Shirsat on tweet Praising Uddhav Thackeray: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक करणाऱ्या ट्वीटवर संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे.

    • Sanjay Shirsat on tweet Praising Uddhav Thackeray: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक करणाऱ्या ट्वीटवर संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे.

Sanjay Shirsat on tweet Praising Uddhav Thackeray: राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होताच एकनाथ शिंदे गटातील नाराजी उफाळून वर येताना दिसत आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेले संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक केल्यानं शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. यावरून शिरसाट यांच्या घरवापसीची चर्चाही सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू होताच संजय शिरसाट यांनी खुलासा केला आहे. अर्थात, या खुलाशावरून आता पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

मंत्रिपद न मिळाल्यामुळं संजय शिरसाट व एकनाथ शिंदे यांच्या खडाजंगी झाल्याचं वृत्त होतं. शिंदे यांनी तेव्हा शिरसाट यांची समजूत काढली होती. मात्र, त्यांची नाराजी कायम असल्याचं दिसत आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे हेच आमचे कुटुंबप्रमुख असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यामुळं तर्कवितर्क सुरू होताच आता त्यांनी खुलासा केला आहे. 

‘माझ्याकडून काही तरी ट्वीट झाल्याचं मला पत्रकारांकडूनच कळलं. मात्र, ही पोस्ट जुनी आहे. ती आता फॉरवर्ड कशी झाली याची कल्पना नाही. हा मोबाइलचा टेक्निकल प्रॉब्लेम असावा. मी त्या पोस्टचं समर्थन करत नाही. मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच होतो, आहे आणि राहणार. त्यातून कुठलाही वेगळा अर्थ काढला जाऊ नये,' असं आवाहन शिरसाट यांनी केलं आहे.

‘मी कधीही दबावतंत्राचा वापर केलेला नाही. माझी जी भूमिका असेल ती मी प्रत्येक वेळी स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यात कधीही तडजोड केलेली नाही. दबाव आणणं किंवा पाहा आता मी उठाव करतो असं दाखवणं हे माझ्या स्वभावात नाही. शिवसेनाप्रमुख असतील किंवा ठाकरे कुटुंबीय, आम्ही त्यांच्याबद्दल कायम आदरभाव ठेवून आहोत. याचा अर्थ आम्ही उद्या काही गडबड करणार आहोत असं नाही,’ असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या