मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli news : करपा रोगामुळं करपली द्राक्ष! तब्बल २५० कोटींची द्राक्षे शेतकऱ्यांनी दिली फेकून

Sangli news : करपा रोगामुळं करपली द्राक्ष! तब्बल २५० कोटींची द्राक्षे शेतकऱ्यांनी दिली फेकून

Jan 07, 2024, 08:57 AM IST

    • Sangli Grapes fram issue : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे, यामुळे पिकांवर परिमाण होत आहे. या हवामान बदलामुळे द्राक्ष बागांवर सर्वाधिक परिमाण झाला असून यामुळे २५० कोटींची द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे.
Sangli Grapes fram issue

Sangli Grapes fram issue : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे, यामुळे पिकांवर परिमाण होत आहे. या हवामान बदलामुळे द्राक्ष बागांवर सर्वाधिक परिमाण झाला असून यामुळे २५० कोटींची द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे.

    • Sangli Grapes fram issue : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे, यामुळे पिकांवर परिमाण होत आहे. या हवामान बदलामुळे द्राक्ष बागांवर सर्वाधिक परिमाण झाला असून यामुळे २५० कोटींची द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे.

Sangli Grapes fram issue : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामान बदल होत आहे. कधी तापमानात वाढ, तर कधी घट, तर कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस. याचा गंभीर परिमाण हा द्राक्ष बागांवर झाला आहे. यामुळे द्राक्षांच्या घडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होत आहे. एकट्या सांगली जिल्ह्यात तब्बल २५० कोटी रुपयांची द्राक्ष शेतकऱ्यांना फेकून द्यावी लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

गूड न्यूज! यंदा वेळेआधीच मान्सूनचे आगमन, ‘या’ दिवशी केरळात होणार दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?

Maharashtra weather update : राज्यात आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; घराबाहेर पडतांना छत्री घेऊन बाहेर पडा

सांगली जिल्ह्यात जवळपास एक लाख २५ हजार एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. येथील द्राक्ष निर्यात देखील केले जातात. मात्र, या वर्षी हंगामाच्या सुरवातीलाच झालेल्या अवकळी पावसामुळे द्राक्षबागांवर याचा परिमाण झाला होता. नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका मिरज, तासगाव तालुक्यातील द्राक्षबागांना बसला. बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळावर काळे व तपकिरी रंगाचे ठिपके पडून द्राक्षाचे घड कुजून गेले. पहिल्या दिवशी गुंठ्यातील द्राक्ष मण्यांवर ठिपके पडल्यानंतर दोन दिवस पूर्ण द्राक्षबागांचेच नुकसान झाले. यामुळे तब्बल २५० कोटी रुपयांच्या बागांचे नुकसान एकट्या सांगली जिल्ह्यात झाले आहे.

bangladesh elections : बांगलादेशात आज निवडणुका! भारत, चीनला सत्तेत हवे हसीना सरकार; काय आहे कारण? वाचा!

प्रामुख्याने तासगाव, मिरज तालुक्यातील जवळपास दहा हजार एकर क्षेत्रातील दाक्षबागांचे नुकसान झाले आहे. घडकूजची लागण झालेला घड काढून फेकून द्यावा लागतो. अशाप्रकारे सुमारे जवळपास २५० कोटी रुपयांची द्राक्षे शेतकऱ्यांनी काढून रस्त्यावर फेकली आहेत. सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे दाक्षघडांवर काळे व तपकिरी रंगाचे ठिपके आले. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातील दाक्षबागांचे नुकसान झाले आहे, असे एका शेतकाऱ्याने सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांपासून मण्यांवर जिवाणूजन्य करप्याची नव्याने लक्षणे दिसून येत आहेत. मण्यांच्या टोकावर वर मण्यांवर काळे तपकिरी लहान, गोलाकार ठिपके आणि मणी कूज व मणी कोरडे होणे ही लक्षणे दिसून येत आहेत. रोग बुरशी जिवाणू प्रजातीच्या प्रादुर्भावामुळे होत आहे, असे मत मांजरी, जि.पुणे येथील दाक्ष संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांचे मत आहे. अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे, तसेच दाक्षबागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या पसरणाऱ्या ठिपक्यांमुळेही द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अशी माहिती सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या