Maharashtra weather update : महाराष्ट्रमध्ये पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रता युक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा व नागपुर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच तापमानात देखील मोठी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रमध्ये पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रता युक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक ट्रफ म्हणजे कमी दाबाची रेषा लक्षद्वीप पासून विदर्भापर्यंत आहे. ती दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्र मधून जात आहे.
महाराष्ट्र मध्ये पुढील ४८ तासात तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी यलो अलर्ट दिलेला आहे. आज विदर्भामधील अकोला अमरावती बुलढाणा व नागपुर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. या ठिकाणी वीजांसह मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे.
पुण्यात देखील आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी अंशतः ढगाळ राहणार आहे . तसेच पुढील तीन दिवस धुके पडण्याची शक्यता आहे. ८ आणि ९ तारखेला मेघगर्जना विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या परिसरात यलो अलर्टचा इशारा दिलेला आहे. उद्यापासून दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दहा तारखेला तुरळक ठिकाणी भुरभुर पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ तारखेनंतर नंतर किमान तापमान तीन ते चार डिग्री सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान आज पासून दहा तारखेपर्यंत तीन ते चार डिग्री सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठं ढगाळ वातावरण जाणावत आहेत. तर काही भागात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक १० जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
संबंधित बातम्या