bangladesh elections : बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होत आहे. दोन टर्म सत्तेवर राहिलेल्या शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील असा निवडणूक सर्वेक्षण अहवाल आहे. गेल्या अनेक वर्षात शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. बांगलादेशने २०२२ पासून ७.१ टक्के विकास दराने दक्षिण आशियातील इतर देशांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांकडून भारत आणि चीन या दोन्ही देशांना मोठ्या अपेक्षा आहेत. शेख हसीना यांनी पुन्हा एकदा बांगलादेशची धुरा सांभाळावी, अशी दोन्ही देशांची इच्छा आहे कारण शेख हसीना यांनी सत्ता हाती घेतल्यापासून दोन्ही देशांसोबतचे संबंध दृढ ठेवले आहेत.
अलीकडच्या काळात, बांगलादेशने दोन आशियाई दिग्गजांमध्ये समतोल राखण्यात यश मिळवले आहे. विशेषत: शेख हसीना सरकारला चीनबाबत भारताच्या मर्यादा काय आहेत आणि ते चीनशी मैत्री किती प्रमाणात वाढवावी हे चांगलेच समजले आहे. स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षांनंतर, बांगलादेश आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वामुळे. बांगलादेशची अर्थव्यवस्था ही ४०० अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेत जगातील अनेक देश स्वत:साठी आणखी संधि शोधत आहेत, त्यामुळेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही बांगलादेशला भेट देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
आता पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये राष्ट्रीय निवडणुका होत असल्याने जगभरातील देशांमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बफर स्टेट म्हणून भारताच्या प्राधान्यक्रमापासून ते चीनच्या बेल्ट अँड रोड व्हिजनपर्यंत, अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीपासून ते रशियासोबतच्या व्यापार करारापर्यंत अनेक महासत्ता आज रविवारी होणाऱ्या या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत.
राजकीय विरोधकांना दडपण्याचा आरोप करूनही पंतप्रधान शेख हसीना पुन्हा विज्याकडे कूच करत आहेत. २०१४ आणि २०१८ च्या निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप असूनही, शेख हसीना या वेळी पुन्हा निवडणूक जिंकतील अशी आशा आहे. अशा वेळी शेख हसीना आणि त्यांच्या सरकारकडून भारत आणि चीनला मोठ्या अपेक्षा आहेत.
बांगलादेशचे दोन्ही देशांसोबत आर्थिक तसेच प्रादेशिक हितसंबंध आहेत. भारत आणि चीन यांच्यात संघर्ष असूनही दोन्ही देशांमधील समन्वय राखण्यात बांगलादेशला यश आले आहे. विशेषत: शेख हसीना सरकारने दोन्ही देशांसोबतचे आपले हित जोपासण्यावर भर दिला आहे. १९७१ च्या युद्धात भारत बांगलादेशला मुक्त करण्यासाठी पाठीशी उभा होता, तर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. हे ऐतिहासिक संबंध असूनही, सध्या बांगलादेशची दोन्ही देशांसोबतची मुत्सद्देगिरी व्यापार आणि आर्थिक हितसंबंधांवर आधारित आहे. बांगलादेशने २०२१-२२ मध्ये भारतासोबत १५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे द्विपक्षीय व्यापार हितसंबंध ठेवले. तर चीनसोबत २५ अब्ज डॉलरर्सचे करार केले आहेत.
प्रादेशिक स्तरावर, भारत बांगलादेशला एक महत्त्वाचे पूर्वेकडील बफर देश म्हणून ओळखला जातो. भारत हा बांगलादेशचा आर्थिक हिताचा भागीदार आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय विकासात योगदान देत भारत बांगलादेशला आवश्यक बंदरे तसेच पॉवर ग्रीडमध्ये प्रवेश प्रदान करतो. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध यामुळे दृढ झाले आहेत.
याशिवाय बांगलादेशचा चीनशी धोरणात्मक संबंध आला आहे. बांगलादेश चीनच्या मेगा प्रोजेक्ट्सचा एक भाग बनून स्वतःसाठी आर्थिक शक्यतांच्या नवीन दिशा शोधत आहे. बांगलादेश हा चिनी शस्त्रास्त्रांचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. त्याचबरोबर संरक्षण आयातीसाठी भारताने बांगलादेशला ५०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे.