मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli: 'तुमची जात कोणती?' खत खरेदी करताना विचारला जातोय प्रश्न, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Sangli: 'तुमची जात कोणती?' खत खरेदी करताना विचारला जातोय प्रश्न, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Mar 10, 2023, 12:54 PM IST

  • Sangli Farmers: सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Farmers

Sangli Farmers: सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • Sangli Farmers: सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Sangli News: राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवादील झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मात्र, या संकटांना पायदळी तुडवून नव्या जोमाने उभ्या राहणाऱ्या बळीराजाला आता वेगळ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. सांगलीत रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मध्ये वाद सुरू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा आहे. रसायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचा आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पोत्यांची संख्या सांगितल्यानंतर पॉस मशिनवर अंगठा देऊन खत मिळायचे. मात्र, सांगलीत गेल्या तीन-चार दिवसांपासून रसायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना थेट त्यांची जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रसायनिक खत खरेदी करताना जात विचारली जात असल्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये वाद सुरु झाले आहेत.

केंद्र सरकारच्या खत मंत्रालयाामार्फत पॉस मशिन ही यंत्रणा चालविली जाते. या मशीनमध्ये काही दिवसांपूर्वी नवीन अपडेट्स आले आहेत. ज्यात शेतकऱ्यांना इतर माहितीसह जातही सांगावी लागत आहे. यासंदर्भात एका कृषी अधिकाऱ्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.नव्या सॉप्टवेअरमध्ये जातीची माहिती कशासाठी घेतली जात आहे? याबाबत सविस्तर माहिती मिळताच शेतकऱ्यांना कळवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या