मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या; उद्घाटनस्थळी तरुणांचा गोंधळ, पोलिसांची धावपळ

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या; उद्घाटनस्थळी तरुणांचा गोंधळ, पोलिसांची धावपळ

Mar 04, 2024, 02:49 PM IST

  • Samruddhi Mahamarg : नाशिक (nashik news) येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाआधीच या ठिकाणी स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांना या कामात प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

समृद्धी मार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या; उद्घाटनस्थळी तरुणांचा गोंधळ (HT)

Samruddhi Mahamarg : नाशिक (nashik news) येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाआधीच या ठिकाणी स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांना या कामात प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • Samruddhi Mahamarg : नाशिक (nashik news) येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाआधीच या ठिकाणी स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात जमले असून त्यांना या कामात प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Nashik News : विकासाचा महामार्ग म्हणून ओळख असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज नाशिक येथे तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा मार्ग आहे. दरम्यान, या उद्घाटनासाठी मान्यवर येण्याच्या आधीच स्थानिक तरुण कार्यक्रम स्थळी जमले असून त्यांनी या कामात स्थानिक तरुणांना प्राधान्यदेत रोजगार देण्याची मागणी केली आहे. अचानक आलेल्या तरूणांमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण तयार झाले. यामुळे पोलिसांची देखील धावपळ उडाली.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

राजकारणासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांचा राजीनामा, लोकसभा निवडणूक लढणार

समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी मार्ग या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन इगतपुरी पथकर प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या उद्घाटन होण्याआधी कार्यक्रमस्थळी अचानक या ठिकाणी ग्रामस्थ जमले. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. यावेळी स्थानिक तरुणांनी एकत्र येत घोषणाबाजी सुरू केली. या महामार्गाच्या कामात स्थानिकांना रोजगार द्या, अशी मागणी तरुणांनी केली. आमच्या जमिनी या मार्गाच्या कामासाठी गेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला या मार्गाच्या कामात रोजगार द्या अशी मागणी तरुणांनी केली. अचानक आलेल्या या तरुणांच्या गर्दीमुळे पोलिसांची धावळप उडाली.

WhatsApp New feature : व्हॉट्सॲपच्या नव्या अपडेटमध्ये यूजर्सना मिळणार भन्नाट पर्याय! चॅट्स चालू आणि बंद करता येणार

यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले आहे. मात्र, ग्रामस्थ आणि तरुण आंदोलनावर ठाम आहेत. उद्घाटना आधीच नागरिकांचा रोष ओढवल्याने शाशन आता काय भूमिका घेणार या कडे लक्ष लागून आहे.

समृद्ध महामार्गाच्या दोन टप्पे खुले करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७२ कि.मी लांबी आहे. हा मार्ग एकूण १६ गावातून जातो. पॅकेज १३ नुसार २३.२५१ कि.मी व पॅकेज १४ अंतर्गत १.६२१ कि.मी लांबीच्या मार्गाचा समावेश यात आहे. तिसऱ्या टप्प्यात पॅकेज १३ अंतर्गत १ व्हायाडक्ट, दारणा नदीवरील १ मोठा पूल आणि ८ छोटे पूल, तसेच वाहनांसाठी ५ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ८ भुयारी मार्ग, ९ ओव्हरपास, पथकर प्लाझा वरील इंटरचेज, टोलबूथ आदि कामे करण्यात आली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या