Calcutta HC judge Abhijit Gangopadhyay resigns news : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी राजकरणासाठी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे त्यांच्या न्यायदानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी राज्यातील विविध शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर दिलेल्या एका निर्णयाने राजकीय वादविवादांना तोंड फुटले होते. तेव्हा पासून न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे प्रकाश झोतात आले होते. गंगोपाध्याय हे आज सोमवारी (दि ४) न्यायाधीश पदाचा राजीनामा देणार आहेत.
न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राजकारणात येण्याचा त्यांचा हेतू सांगितला. ते म्हणाले, "केवळ राजकीय क्षेत्रच असे आहे की जे खऱ्या अर्थाने असहाय्य नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवू शकतात. गेल्या दोन वर्षांपासून मी भ्रष्टाचार विरोधात लढा देत आहे. विशेषत: शिक्षण क्षेत्रातील गैर कारभारावर मी भर दिला. मात्र, मी मंगळवारी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देईन.
न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय हे या वर्षाच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, आज ते त्यांच्या न्यायाधीश पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या प्रती भारताचे सरन्यायाधीश आणि कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठवल्या जाणार आहेत.
न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय म्हणाले, गेल्या दोन पेक्षा जास्त वर्षांपासून मी काही प्रकरणे हाताळली आहेत. ही प्रकरणे शिक्षणाशी संबंधित आहेत. या मध्ये मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर खटले सुरू आहेत, असे न्यायमूर्ती गंगोपाध्याय म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये विशेषत: भविष्य निर्वाह निधी ग्रॅच्युइटीमध्ये "मोठा नियुक्ती घोटाला" सुरू आहे. "मी या संदर्भात काही आदेश पारित केले आहेत. परंतु कामगार, कामगार कायदे या विषयांवर लक्ष देताना मी कमी पडलो आहे.
न्यायमूर्ती गंगोपाध्याय म्हणाले, “आता मला मोठ्या लोकांकडे जायला हवे.” “कोर्टात, एखाद्या व्यक्तीने केस दाखल केल्यास न्यायाधीश त्याच्यासमोर येणाऱ्या बाबी हाताळतात. पण आपल्या देशात आणि राज्यात, पश्चिम बंगालमध्येही. खूप असहाय्य लोक मोठ्या संख्येने आहेत."
न्यायमूर्ती गंगोपाध्याय हे त्यांच्या जलद न्यायदानासाठी ओळखले जातात. यामुळे ते नेहमी चर्चेत देखील असतात. त्यांनी पश्चिम बंगाल सरकार प्रायोजित आणि अनुदानित शाळांमधील अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांना निर्देश देणारे अनेक आदेश जारी केले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांमध्ये असंतोषही पसरला आहे.
पश्चिम बंगालमधील आरक्षित श्रेणीतील एमबीबीएस जागांसाठी इच्छुक उमेदवारांना जात प्रमाणपत्र देण्याच्या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी सुरू करण्यावरून त्यांचे एकल खंडपीठ आणि उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठात झालेल्या वादानंतर, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये हस्तक्षेप केला आणि त्यांची बदली केली.
राजीनामा दिल्यानंतर ते मंगळवारी दुपारी दीड वाजता महान स्वातंत्र्यसैनिक मास्टरदा सूर्य सेन यांच्या उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोरील पुतळ्यासमोर प्रसार माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत. न्यायमूर्ती गंगोपाध्याय २ मे २०१८ रोजी कोलकाता उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले. उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ३० जुलै २०२० रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.
संबंधित बातम्या