मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी पोल २ ते ३ फुट वर आला, प्रवाशांचा जीव धोक्यात, VIDEO

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी पोल २ ते ३ फुट वर आला, प्रवाशांचा जीव धोक्यात, VIDEO

Dec 29, 2023, 08:20 PM IST

  • Samruddhi Expressway News : समृद्धी महामार्गाच्या मधोमध दोन्ही पुलाला जोडणाऱ्या एक्सप्रेसर जॉइनचा लोखंडी रॉड वर आला आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

Samruddhi Expressway (file Pic)

Samruddhi Expressway News : समृद्धी महामार्गाच्या मधोमध दोन्ही पुलाला जोडणाऱ्या एक्सप्रेसर जॉइनचा लोखंडी रॉड वर आला आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

  • Samruddhi Expressway News : समृद्धी महामार्गाच्या मधोमध दोन्ही पुलाला जोडणाऱ्या एक्सप्रेसर जॉइनचा लोखंडी रॉड वर आला आहे. यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरुवातीपासूनच कायम चर्चेमध्ये राहिला आहे. अपघातांच्या घटनांमुळे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या काही महिन्यापासून समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. आता बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ मुंबई कॅरिडोरमध्ये एका पुलाचा लोखंडी रॉड महामार्गावर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र एका वाहनचालकांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

गुरुवारी रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा जवळ पुलाचा लोखंडी भाग तुटून महामार्गावर आला होता. हा प्रकार एका वाहनचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने याचा व्हिडिओ बनवला व टोल नाक्याला पाठवला. त्यानंतर याची तत्काळ दुरुस्ती केल्याने मोठा अपघात टळला आहे.

समृद्धी महामार्गावर ताशी १२० किलोमीटर इतकी वेग मर्यादा आहे. इतक्या प्रचंड वेगाने जर एखादे वाहन या लोखंडी रॉडला धडकले असते तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

व्हिडिओमध्ये दिसते की, समृद्धी महामार्गाच्या मधोमध दोन्ही पुलाला जोडणाऱ्या एक्सप्रेसर जॉइनचा लोखंडी रॉडवर आला होता. बुलढाणा टोल नाक्याजवळ हा लोखंडी पोल सुमारे दोन फुट वर आला आहे. हा लोखंडी पोल दोन ते तीन फूट रस्त्याच्या वर आला असल्यामुळे जर कोणते वाहन याला धडकले असते तर पलटी होण्याचा धोका निर्माण झाला होता.

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात झाले असून शेकडो लोकांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्ग प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

मात्र आजच्या प्रकाराने पुन्हा एका समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेमतेम एक वर्षही झाले नाही, तोवर पुलावरील लोखंडी रॉड वर येत आहेत, रस्त्यात खड्डे पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या