मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक; 'या' वेळेत मार्ग राहणार ४ तासांसाठी बंद

समृद्धी महामार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक; 'या' वेळेत मार्ग राहणार ४ तासांसाठी बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 21, 2023 12:56 PM IST

Samruddhi Mahamarg two days mega block : समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर आज आणि उद्या दोन दिवस ४ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Samruddhi Mahamarg block
Samruddhi Mahamarg block (HT)

Samruddhi Mahamarg two days mega block : समृद्धी मार्गाने जर तुम्ही आज आणि उद्या प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. या मार्गावर आज आणि उद्या मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. येथील वाहतूक ही दोन्ही दिवस चार तासांसाठी बंद राहणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचं काम करण्यात येणार असल्याने दुपारी १२ ते ४ दरम्यान हा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या काळात हा मार्ग जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Forecast : राज्यात थंडीच्या कडाका वाढणार! तीन दिवसांत तापमानात होणार मोठी घट, असे असेल हवामान

राज्यातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळख असणाऱ्या समृद्धी महामार्गावर विविध कामे सुरू आहेत. आज आणि उद्या या मार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनीचे टॉवर उभारण्यात येणार आहे. हे काम कसारण्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुंची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ४ दरम्यान हे काम पूर्ण केले जाणार असून यानंतर या मार्गावरील वाहतूक ही पूर्ववत केली जाणार आहे, असल्याची माहिती माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली.

macau casino : जुगार खेळणाऱ्यांची पंढरी मकाऊ कॅसिनो पहिले का ?अमेरिकेच्या लॉस वेगासलाही टाकले मागे; पाहा फोटो

समृद्धी मार्गावरील मेगा ब्लॉक दरम्यान, अशी असेल वाहतूक व्यवस्था

समृद्धी मार्गावर आज आणि उद्या दुपारी १२ ते ४ मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून या दरम्यान, जालना ते संभाजी नगर येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (आय सी १४ ) ते सावंगी इंटरचेंज (आयसी १६) दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतुक निधोना (जालना) इंटरचेंज आय सी १४ मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. आयसी १६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे वळवण्यात आली आहे.

तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. आयसी १६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. आयसी १४ या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे वळवण्यात आली आहे.

WhatsApp channel