मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Athawale : रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर, म्हणाले...

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर, म्हणाले...

May 29, 2023, 03:02 PM IST

    • Ramdas Athawale News : नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी करत घोषणाबाजी करणाऱ्यांना पक्षाबाहेर केलं जाईल, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.
Ramdas Athawale On Prakash Ambedkar (HT)

Ramdas Athawale News : नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी करत घोषणाबाजी करणाऱ्यांना पक्षाबाहेर केलं जाईल, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

    • Ramdas Athawale News : नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी करत घोषणाबाजी करणाऱ्यांना पक्षाबाहेर केलं जाईल, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.

Ramdas Athawale On Prakash Ambedkar : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरयाणा आणि लोकसभेच्या निवडणुकीची अनेक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केलेली आहे. तर रामदास आठवलेंची आरपीआय भाजपसोबत आहे. त्यामुळं आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलत असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी थेट प्रकाश आंबेडकरांना भाजपसोबत युती करण्याची खुली ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, त्यांना मी भाजपकडे घेऊन जातो. कारण उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांना काहीही मिळणार नाहीय, असं म्हणत रामदास आठवले यांनी आंबेडकरांना खुली ऑफर देत राजकीय खळबळ उडवून दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत पार पडलं. त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे कसे आहेत, हे मला माहिती आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर भाजपासोबत आले तर मी त्यांचं स्वागतच करेल. आरपीआयची ज्याच्याशी युती असते, तोच पक्ष देशात आणि राज्यात सत्तेत येत असतो. ही गोष्ट प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घेऊन आमच्यासोबत युती करावी, असं म्हणत रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना आघाडीसाठी साद घातली आहे.

आरपीआयच्या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं आहे. काही कार्यकर्त्यांमुळं पक्षाचा सत्यानाश होत आहे. नुसते फोटो काढून, गर्दी करून आणि केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांमुळं पक्ष वाढणार नाहीय. नुसती फोकसगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले आहे.

पुढील बातम्या