मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray: राज्याचे गृहमंत्री फडतूस, रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray: राज्याचे गृहमंत्री फडतूस, रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Apr 04, 2023, 05:08 PM IST

  • Uddhav Thackeray Slams Devendra Fadnavis: रोशनी शिंदे मारहाणीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Uddhav Thackeray (PTI)

Uddhav Thackeray Slams Devendra Fadnavis: रोशनी शिंदे मारहाणीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • Uddhav Thackeray Slams Devendra Fadnavis: रोशनी शिंदे मारहाणीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत फेसबूकवर पोस्ट केली म्हणून रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे ठाण्यात राजकीय पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Maharashtra Weather Update: पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता! मुंबईत उकाडा कायम

रोशनी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक फेसबूक पोस्ट केली होती. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. रोशनी शिंदे सोमवारी (३ एप्रिल २०२३) संध्याकाळी ऑफिसमधून घरी परत येताना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसोबत जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. रोशनी शिंदे मारहाणीप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली नसून राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवले.

या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा राजन विचारे यांनी केला आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली आहे. रोशनी शिंदे मारहाणप्रकरणामुळे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच याप्रकरणी एकनाथ शिंदेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

पुढील बातम्या