मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kamathi Rape Case : लव्ह, रिलेशनशिप, सेक्स अन् धोका; नागपुरच्या तरुणीसोबत घडला भयंकर प्रकार

Kamathi Rape Case : लव्ह, रिलेशनशिप, सेक्स अन् धोका; नागपुरच्या तरुणीसोबत घडला भयंकर प्रकार

Feb 06, 2023, 02:22 PM IST

    • Nagpur Rape Case : कुटुंबियांसह देवदर्शनाला गेली असता तिथं तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Rape Case In Kamathi Nagpur City (HT)

Nagpur Rape Case : कुटुंबियांसह देवदर्शनाला गेली असता तिथं तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

    • Nagpur Rape Case : कुटुंबियांसह देवदर्शनाला गेली असता तिथं तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

Rape Case In Kamathi Nagpur City : देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणीशी ओळख करून तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करत आरोपीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नागपुरातील कामठी परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीला तातडीनं अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता नागपुरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर आता रिक्षाचालकानं तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळं नागपुरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कामठी परिसरातील तरुणी आपल्या कुटुंबियांसह देवदर्शनासाठी गेली होती. तिथं तिची एका रिक्षाचालकासोबत ओळख झाली. दोघांची चांगली मैत्री झाल्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आरोपीनं तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून अज्ञातस्थळी नेत अनेकदा बलात्कार केला. या प्रकरणाची माहिती तरुणीच्या कुटुंबियांना समजताच तरुणीनं आरोपीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर तरुणी कुटुंबियांना सोडून आरोपीसोबत शहरातील दुसऱ्या ठिकाणी रहायला गेली. आरोपीनं २०२० ते २०२२ या दोन वर्षात तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केला.

पीडित तरुणीनं लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपीनं त्यासाठी नकार देत तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पीडित तरुणीनं आरोपीविरोधात नागपुरातील कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला तातडीनं अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला असून पुढील कार्यवाही सुरू केल्याची माहिती दिली आहे.

पुढील बातम्या