मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘शिवराय नसते तर शरदचा शमशुद्दीन अन् अजितचा अझरूद्दीन झाला असता’, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

‘शिवराय नसते तर शरदचा शमशुद्दीन अन् अजितचा अझरूद्दीन झाला असता’, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 06, 2023 01:57 PM IST

Gopichand Padalkar Controversial Statement : राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. त्यामुळं आता यावरून नवं वादंग पेटण्याची शक्यता आहे.

BJP MLA Gopichand Padalkar Controversial Statement
BJP MLA Gopichand Padalkar Controversial Statement (HT)

BJP MLA Gopichand Padalkar Controversial Statement : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमुळं भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीविरोधात भाजपकडून आंदोलनं करण्यात येत आहे. त्यानंतर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अझरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन झालं असतं, असं वक्तव्य आमदार पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्डाड हे सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देवी-देवतांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. कदाचित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून बोलत असावेत, असं मला वाटतं. जर शिवराय नसते तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अझरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन, आणि रोहितचा रजाक झाला असता, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महापुरुषांवर अशा प्रकारची वक्तव्ये करून घाण राजकारण करणं ही कूटनीती शरद पवार गेल्या ५० वर्षांपासून करत आहेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावं, हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. हिंदू लोकांनी समजून घेतलं तर त्यांना जनतेकडून योग्य उत्तर देण्यात येणार असल्याचाही दावा पडळकरांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता, अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. त्यावरून भाजपनं राष्ट्रवादीला लक्ष्य केलं असून त्यानंतर आता पडळकरांनी पवारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर असं वक्तव्य करणाऱ्यांची सुंता झाली की काय, याचा तपास करायला हवा, असंही वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्यामुळं आता यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point