मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  majalgaon mosque news : मशिदीच्या भिंतीवर लिहिलं 'जय श्रीराम', बीड जिल्ह्यातील माजलगावात तणाव

majalgaon mosque news : मशिदीच्या भिंतीवर लिहिलं 'जय श्रीराम', बीड जिल्ह्यातील माजलगावात तणाव

Mar 26, 2024, 01:31 PM IST

  • Beed Majalgaon mosque news : बीडच्या माजलगावातील मशिदीच्या भिंतीवर काही समाजकंटकांनी जय श्रीराम लिहिल्यामुळं तणाव निर्माण झाला आहे.

मशिदीच्या भिंतीवर लिहिलं 'जय श्रीराम', बीड जिल्ह्यात तणाव

Beed Majalgaon mosque news : बीडच्या माजलगावातील मशिदीच्या भिंतीवर काही समाजकंटकांनी जय श्रीराम लिहिल्यामुळं तणाव निर्माण झाला आहे.

  • Beed Majalgaon mosque news : बीडच्या माजलगावातील मशिदीच्या भिंतीवर काही समाजकंटकांनी जय श्रीराम लिहिल्यामुळं तणाव निर्माण झाला आहे.

Beed Majalgaon mosque news : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मरकझ मशिदीच्या भिंतीवर काही समाजकंटकांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा लिहिल्यानं जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

धुलिवंदनाच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास ही घटना घडली. ही बाब लक्षात येताच मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं एकत्र आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईचा आग्रह धरला. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं होतं.

बीड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज कुमार यांनी संदर्भात अधिक माहिती दिली. 'सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही समाजकंटकांनी मशिदीच्या भिंतीवर श्रीराम लिहिलं. हे कृत्य अत्यंत चुकीचं आहे. आम्ही कलम २९५ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. गुन्हेगाराचा शोध सुरू आहे. येत्या २४ तासांत त्याला अटक करू, असं आश्वासन धीरजकुमार यांनी निदर्शकांना दिलं आहे.

‘गुन्हेगारावर जास्तीत जास्त कलमे लावू. त्याला नक्की शिक्षा होईल. रमझान सुरू आहे. त्यामुळं मुस्लिम समाज बांधवांनी शांतता राखावी. सण उत्साहानं साजरा करावा. पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. आता पोलीस आपलं काम चोख करतील,’ असं आश्वासनही धीरजकुमार यांनी दिलं.

या घटनेनंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून संबंधित मशिदीलाही सुरक्षा देण्यात आली आहे. या प्रकारानंतर सामाजिक संघटनाच्या नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या