मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  lonavla raging incident: रॅगिंग सहन न झाल्याने दिव्यांग विदयार्थ्यांनीला ब्रेन स्ट्रोक; लोणावळ्यातील प्रकार

lonavla raging incident: रॅगिंग सहन न झाल्याने दिव्यांग विदयार्थ्यांनीला ब्रेन स्ट्रोक; लोणावळ्यातील प्रकार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 26, 2024 01:08 PM IST

lonavla ragging incident: लोणावळ्यातील एका मोठ्या आणि नामांकित विद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीवर सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आह

लोणावळ्यातील एका मोठ्या आणि नामांकित विद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याने खळबळ उडाली आहे.
लोणावळ्यातील एका मोठ्या आणि नामांकित विद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याने खळबळ उडाली आहे.

Lonavla ragging news : पुण्यात पुन्हा एकदा रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणीने रॅगिंगमुळे आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना लोणावळ्यातील  एका मोठ्या आणि नामांकित विद्यालयात एका दिव्यांग मुलीची रॅगिंग घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्का सहन न झाल्याने या मुलीला ब्रेन स्ट्रोक आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या मुलीवर पिंपरी-चिंचवड येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

billionaire city news : भारतातील 'या' शहरात तब्बल ९२ अब्जाधीश! चीनच्या बीजिंगला मागे टाकून पटकावला तिसरा क्रमांक

पुण्यात कात्रज येथे एका तरुणीने रॅगिंगमुळे स्वत:ला पेटून घेतले होते. पुण्यात रॅगिंगचे प्रकार वाढले असल्याने तरुण आणि तरुणी टोकाचे पाऊल उचलत आहेत. कॉलेजमध्ये अनेक सीनिअर विद्यार्थी ज्युनिअर्सचं रॅगिंग करत असून बऱ्याच वेळेस ते मजेखातर असले तरी त्याचा त्रास संबंधित विद्यार्थ्याला होऊ शकतो. यामुळे त्या मुलाचे आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. लोणावळ्यात देखील एका महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आला आहे.

Pune Range Hills news : पुण्यात भयानक घटना! झोपेत असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अ‍ॅसिड हल्ला

गेल्या तीन महिन्यापासून रॅगिंगचा हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. यामुळे या मुलीचा त्रास वाढत गेला आणि त्यातून हा प्रकार झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

लोणवळ्यात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी ही बिबीए आणि सीएच्या च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. कल्याणी गजानन निकम असे या मुलीचे नाव आहे. ती मुलींच्या वसतिगृहात राहत होती. मात्र, तिचे काही सीनियर गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तिची रॅगिंग करत होते. यात तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले जात होते. तर काही जण तिच्या पाठीमागे चाकू घेऊन धावत होते. या घटनेत तिला दोन वेळा चाकू देखील लागला आहे. यामुळे तिच्या पालकांनी वसतीगृहाच्या वॉर्डनला तक्रार देखील केली होती. मात्र, तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे अखे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पोलिसांनी देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर रॅगिंग सहन न झाल्याने कल्याणीला ब्रेन स्ट्रोक आला. सध्या तिच्यावर पिंपरी- चिंचवडमधील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

WhatsApp channel

विभाग