मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Athawale: शिवसेना-वंचितच्या युतीवर रामदास आठवले एक दिवसानं बोलले, पण रोखठोक बोलले!

Ramdas Athawale: शिवसेना-वंचितच्या युतीवर रामदास आठवले एक दिवसानं बोलले, पण रोखठोक बोलले!

Jan 24, 2023, 10:02 AM IST

  • Thackeray- Ambedkar Alliance: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीचा राज्यातील राजकारणावर फरक पडू शकतो का? यावर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.

Ramdas Athawale (ANI/PIB)

Thackeray- Ambedkar Alliance: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीचा राज्यातील राजकारणावर फरक पडू शकतो का? यावर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.

  • Thackeray- Ambedkar Alliance: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीचा राज्यातील राजकारणावर फरक पडू शकतो का? यावर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.

Maharashtra Politics: लोकशाही आणि स्वातंत्र्याची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी (23 जानेवारी २०२३) दादर (Dadar) येथील आंबेडकर भवनात केली. ठाकरे-आंबेडकर यांच्यातील युतीनंतर केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्याच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही, ते दोघे एकत्र आले म्हणजे शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आले असे म्हणता येत नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

महाबळेश्वर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे एक दिवसीय अभ्यास शिबिर महाबळेश्वर येथे होत आहे. या शिबिरासाठी जात असताना रामदास आठवले यांनी वाई येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे-आंबेडकर यांच्यातील युतीवर भाष्य केले. “उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन युतीचा काहीही राज्याच्या कारणावर काहीही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ते पर्याय शोधत आहेत आणि म्हणून त्यांनी वंचितशी युती केली आहे. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती महायुतीत भाजपसोबत एकत्र आले. त्यावेळी आम्ही भरपूर जागाही जिंकलेलो आहोत. ”

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केले. मुंबई महापालिकेमध्ये भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा झेंडा फडकेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देश खऱ्या अर्थाने विकासाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्यासोबत आहेत, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने युतीची केलेली घोषणा ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. या युतीने राज्यातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलतील, असे म्हणणे तर्तू धारिष्ट्याचे ठरेल. पुढील काळात युती कशी आकारास येते? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

पुढील बातम्या