मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नाराज वसंत मोरेंना राज ठाकरे यांचे आश्वासन! ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येईन’

नाराज वसंत मोरेंना राज ठाकरे यांचे आश्वासन! ‘वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी येईन’

May 08, 2022, 06:36 PM IST

    • पुण्याच्या राजकीय वर्तूळात पून्हा चर्चांना उधाण; मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
वसंत मोरे-राज ठाकरे

पुण्याच्या राजकीय वर्तूळात पून्हा चर्चांना उधाण; मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

    • पुण्याच्या राजकीय वर्तूळात पून्हा चर्चांना उधाण; मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

पुणे : राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या सभेत हिंदूत्ववादाचा पुरस्कार करत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात आंदोलन सुरू केले आहे. हा मुद्दा संपूर्ण राज्यासह देशात गाजत आहे. राज यांच्या भूमिकेमुळे मनसेत असलेल्या अनेक मुस्लिम पदाधिका-यांनी राजीनामे दिले होते. त्यात मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. यामुळे ते शहराध्यक्षपदावरुन दूर झाले. मात्र, आपण नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले होते. पण, मनसेने केलेल्या कुठल्याच आंदोलनात वसंत मोरे कुठेच दिसले नव्हते.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

गेल्या महिन्यात पुण्यात राज ठाकरे यांनी महाआरती घेतली होती. मात्र, ते गैरहजर होते. मात्र, त्यांनी शनिवारी स्वत: महाआरती केली. यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. असे असले तरी पक्षाच्या कुठल्याच कार्यात ते दिसले नसल्याने त्यांनी मनसेला रामराम केला असेच वातावरण राजकीय वर्तूळात व्यक्त केले जात होते. मात्र, राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार तिरुपती बालाजी येथे गेलो असल्याचे त्यांनी सांगिलते. या बाबत राज ठाकरे यांना कल्पना दिली असल्याचेही स्पष्ट केले होते.

यानंतर शनिवारी राज ठाकरे हे पुण्यात असतांना मोरे यांनी पुण्यात कात्रज येथे महाआरतीचे आयोजन केले होते. मात्र, राज यावेळी अनुपस्थित होते. यामुळे राज मोरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळेच ते उपस्थित नव्हते अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र, राज यांची महाआरतीनंतर मोरे यांनी भेट घेतली. यावर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सांगितले की मला महाआरतीला येता आले नाही. पण, वसंत तू मिसळ महोत्सव घे, मी नक्की येईन, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

दरम्यान आता वसंत मोरे काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. ते मिसळ महोत्सव कधी आयोजित करतात. आणि राज यांना कधी आमंत्रण देतात. तसेच राज हे त्यांच्या मिसळ महोत्सवाला येतील का हे पाहणे आता औत्सूक्याचे ठरणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या