मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loudspeaker Row : ..त्यामुळे मुंबईतील दोन मशिदींवर पोलिसांची कारवाई

Loudspeaker Row : ..त्यामुळे मुंबईतील दोन मशिदींवर पोलिसांची कारवाई

May 07, 2022, 07:49 PM IST

    • वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मुंबईतील दोन मशिदींवर पोलिसांची कारवाई

वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    • वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुंबई -  सध्या राज्यातील राजकारण मशिदींवरील भोंग्या भोवतीने फिरताना दिसत आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या नियमावलींचे पालन न केल्याने मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या ट्रस्टीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन वांद्रे येथील नुरानी मशिदीच्या व्यवस्थापनाने केले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कलम ३७ (१), (३), १३५ नुसार तक्रार दाखल केली आहे. कायदा आणि ध्वनी बंदी नियमांचे कलम.३३ (R)(३) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईच्या सांताक्रूझ पोलिसांनी लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीशी संबंधित लोकांवरही नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी वांद्रे येथील नुरानी मशिदीमध्ये लाऊडस्पीकरवर नमाज अजान करण्यात आली. सकाळी ६ च्या आधी लाऊडस्पीकर न वापरण्याबाबत पोलिसांनी एक दिवस अगोदर सूचना देऊनही मशिदीत सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यात आले. 

त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करत लाऊडस्पीकरवर दुपारची अजान मोठ्या आवाजात देण्यात आली. पोलिसांनी याची दखल घेत घटनास्थळी पोहोचून लाऊडस्पीकर मशीन ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांनुसार कारवाई केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या