मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मनसेचा महाआरती कार्यक्रम रद्द; राज ठाकरे यांनी सांगितलं कारण

मनसेचा महाआरती कार्यक्रम रद्द; राज ठाकरे यांनी सांगितलं कारण

May 02, 2022, 06:04 PM IST

    • राज्यभरात उद्या, ३ मे रोजी होणारा मनसेचा महाआरती कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात आला आहे.
राज ठाकरे (HT_PRINT)

राज्यभरात उद्या, ३ मे रोजी होणारा मनसेचा महाआरती कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात आला आहे.

    • राज्यभरात उद्या, ३ मे रोजी होणारा मनसेचा महाआरती कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात आला आहे.

मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker Row) विरोधात भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी ३ मे रोजी राज्यभरात महाआरतीचा कार्यक्रम घेण्याचे आदेश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, हा कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी तसं ट्वीट केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

महाआरती रद्द करण्यामागचं कारण राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. 'उद्या ईद आहे. संभाजीनगरमध्ये काल झालेल्या सभेत मी त्याबाबत बोलले आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदात साजरा व्हावा. त्यामुळं आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठंही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत आपण पुढं नेमकं काय करायचं हे मी उद्या ट्वीटरच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडेनच, असं राज यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. ईदनंतर मशिदींवरील भोंगे काढले न गेल्यास मंदिरावर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत दिला होता. तत्पूर्वी, ३ मे रोजी राज्यभरात मनसेच्या वतीनं महाआरतीचं आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र, सणाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात आला आहे. पुढील दिशा लवकरच स्पष्ट करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं ईदनंतर राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय सूचना देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या