मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार

Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोनदा धावणार

Mar 09, 2024, 06:28 AM IST

    • Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी (indian railway) रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
पुणे ते अमरावती विशेष गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार

Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी (indian railway) रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

    • Pune-Amravati train : विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी (indian railway) रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

Pune-Amravati train : पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. पुणे-अमरावती एक्स्प्रेस असे या गाडीचे नाव असून ही गाडी १० मार्चपासून दर शुक्रवारी आणि सोमवारी पुण्याहून रात्री १०.४५ वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अमरावतीला पोहोचेल.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Prakash Ambedkar : देशावर कर्जाचा डोंगर उभा करतील, संन्यास घेतील अन् निघून जातील, प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर घणाघात

अमरावती – पुणे एक्स्प्रेस ही गाडी अमरावतीहून ९ मार्चपासून दर शनिवारी आणि सोमवारी रात्री ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. पुणे ते अमरावती या मार्गावरील प्रवाशांना या गाडीमुळे फायदा होणार आहे.

या गाडीला उरुळी, केडगाव, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा हे थांबे आहेत. या गाडीला एकूण १७ आयसीएफ डबे आहेत. त्यात एक फर्स्ट एसी, एक एसी २ टियर, दोन एसी-३ टियर, ५ स्लीपर क्लास, ८जनरल सेकंड क्लाससह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असेल. या गाडीसाठी आरक्षण ९ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Mumbai Pune expressway traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; बोरघाटात तब्बल १५ किमी पर्यंत रांगा

या पूर्वीही विदर्भात जाण्यासाठी रेल्वेने नव्या गाड्या सुरू केल्या आहेत. विदर्भात जाण्यासाठी पुणे नागपूर एक्सप्रेस, पुणे बिलासपुर एक्सप्रेस, पुणे नागपूर गरीब रथ, हावरा एक्सप्रेस, या प्रमुख गाड्या आहेत. दरम्यान, या नव्या गाडीमुळे इतर गाड्यांवरील तान कमी होणार आहे.

मुंबईत मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (१० मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार ते ठाणे दरम्यान तर हार्बर मार्गावर डाऊन व अप मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या