(5 / 5)बोरघाट महामार्ग पोलीस कक्षाला संपर्क करायला, टोल फ्री क्रमांक असला तरी त्यावर यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. येथे महामार्ग पोलिसांचे वाहतूक कोंडी होण्याच्या कारणांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्याचा परिणाम असा रात्री अपरात्री या द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. शुक्रवारी याठिकाणी कोणताही पोलीस कर्मचारी येथील वाहतूक कोंडी सोडवताना पाहायला मिळाला नाही. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.