मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: KFC हॉटेलची फ्रॅंचाईजी देण्याच्या नावाखाली महिलेला ७९ लाखांनी गंडवले

Pune Crime: KFC हॉटेलची फ्रॅंचाईजी देण्याच्या नावाखाली महिलेला ७९ लाखांनी गंडवले

Aug 15, 2022, 07:17 PM IST

    • पुण्यात एका महिलेला KFC या प्रसिद्ध हॉटेलची फ्रॅंचाईजी देतो अशी बतावणी करून एका महिलेला तब्बल ७९ लाखांनी गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News (HT_PRINT)

पुण्यात एका महिलेला KFC या प्रसिद्ध हॉटेलची फ्रॅंचाईजी देतो अशी बतावणी करून एका महिलेला तब्बल ७९ लाखांनी गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • पुण्यात एका महिलेला KFC या प्रसिद्ध हॉटेलची फ्रॅंचाईजी देतो अशी बतावणी करून एका महिलेला तब्बल ७९ लाखांनी गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे: पुण्यात फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका महिलेला केएफसी या प्रसिद्ध हॉटेलची फ्रॅंचाईजी काढून देतो अशी बतावणी करून एका महिलेला तब्बल ७९ लाखांनी गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार तब्बल ३ महिन्यांपासून सुरू होता. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

फसवणूक झालेली महिला ही इस्टेट एजंट आहे. तिला नवा व्यवसाय सुरू करायचा होता. या साठी ती शोध घेत होती. नव्या व्यवसायाचा शोध घेत असताना तसेच चौकशी करत असताना तिची ओळख गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू या तिघांशी झाली. या महिलेने तिला नवा व्यवसाय सुरू करायचा असल्याचे सांगितले. या तीन भामट्यांनी या महिलेला केएफसी या हॉटेलची फ्रॅंचाईजी मिळून देतो असे सांगितले.

दरम्यान, या महिलेचा विश्वास संपादन करून तिला चार वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये तब्बल ७९ लाख ७६ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. जवळपास तीन महिन्यांपासून त्या या चोरट्यांना पैसे देत होत्या. चोरट्यांनी महिलेला कंपनीची खोटी वेबसाइट दाखवली. यामुळे त्यांना आपल्याला फ्रॅंचाईजी मिळेल असा विश्वास त्यांना वाटला. मात्र, काही दिवस उलटले त्या चोरट्यांनी या महिलेला कुटल्याच प्रकारे संपर्क केला नाही. या महिलेने अनेक वेळा त्यांना फोन केला. मात्र, त्यांचे फोन बंद आले. यामुळे आपली फवणूक झाल्याचे कळल्यावर तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या