मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune crime: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune crime: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

Aug 14, 2022, 12:13 AM IST

    • पुण्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime (HT_PRINT)

पुण्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • पुण्यात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या मुलाने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Urulikanchan news : वीज पडल्याचा आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

गणेश मोरे (वय २१, रा. गुलटेकडी ) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात बाल अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) तसेच बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे याने अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिला विवाहाचे आमिष दाखविले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश मोर आणि अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिला तळजाई, खेड शिवापूर परिसरात नेले. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिला. यामुळे तिने अंगावर रॅाकेल ओतून पेटवून घेतले.तिला रुग्णालयात भरती केले आहे. त्यानंतर तिच्या आईने पोलिसात धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वालकोळी तपास करत आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या