मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पती पासून विभक्त राहण्याऱ्या महिलेला पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime : पती पासून विभक्त राहण्याऱ्या महिलेला पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

Aug 15, 2022, 05:09 PM IST

    • पुण्यात पतीपासून विभक्त राहण्याऱ्या एका महिलेवर गुन्हेगाराने अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे क्राइम

पुण्यात पतीपासून विभक्त राहण्याऱ्या एका महिलेवर गुन्हेगाराने अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    • पुण्यात पतीपासून विभक्त राहण्याऱ्या एका महिलेवर गुन्हेगाराने अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे : पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका महिलेवर अत्याचार करून एका सराईत गुन्हेगाराने तिला पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

शुभम संभाजी पाटील (वय ३०, रा. बकोरी) असे गुन्हा दाखल झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पीडित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडीत महिला आणि तिच्या पतीचे पटत नव्हते. त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. यामुळे कंटाळून पीडित महिला ही पतीपासून वेगळी राहत होती. तिला दहा वर्षांचा मुलगादेखील आहे. दरम्यान महिलेशी आरोपी शुभम पाटील याच्याशी ओळख झाली. महिलेच्या असहायतेचा फायदा आरोपीने घेतला.

 

दरम्यान पीडितेवर आरोपी पाटील ने अत्याचार केले. तसचे तो महिलेवर संशयही घेत होता. पाटीलने जबरदस्तीने ठेवलेल्या शरीर संबंधांमुळे पीडिता ही गरोदर राहिली. मात्र, आरोपी पाटील तिच्यावर संशय घेत तिला तिच्या दहा वर्षांच्या मुलासमोर मारहाण केली. तसेच बाधरूम मधील पाण्याच्या बादलीत तोंड बुडवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न त्याने केला. यानंतर पीडितेने कशी बशी स्वत: ची सुटका करून घेतली. लोणीकंद पोलिसांनी पाटील याच्या विरोधात बलात्कार, खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या