मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Babaraje Deshmukh Arrest : बाबाराजे देशमुखांना पोलिसांकडून अटक, मावळातील खंडणी प्रकरणात कारवाई

Babaraje Deshmukh Arrest : बाबाराजे देशमुखांना पोलिसांकडून अटक, मावळातील खंडणी प्रकरणात कारवाई

May 18, 2023, 10:08 PM IST

    • Babaraje Deshmukh Arrest : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख यांना मावळ पोलिसांनी अटक केली आहे.
Babaraje Deshmukh Arrest By Maval Police (HT)

Babaraje Deshmukh Arrest : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख यांना मावळ पोलिसांनी अटक केली आहे.

    • Babaraje Deshmukh Arrest : खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख यांना मावळ पोलिसांनी अटक केली आहे.

Babaraje Deshmukh Arrest By Maval Police : भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या बाबाराजे देशमुख यांना मावळ पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या मावळमधील एका बांधकाम अभियंत्याला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मावळ पोलिसांनी देशमुख यांना अटक केली असून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर शिरगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बाबाराजे देशमुख यांनी ७० लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार अधिकाऱ्याने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

Maharashtra Weather Update:राज्यावर अवकाळीचे संकट! पुणे, नाशिक, नगरसह बहुतांश जिल्ह्यात बरसणार! बाहेर पडतांना काळजी घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळमध्ये वनविभागाची पाच एकर जमीन आहे. या जमिनीवर कायदेशीर मार्गाने प्लॉटिंग होत नाही. परंतु तरीदेखील बाबाराजे देशमुख यांनी वनविभागाची २५ गुंठे जागा परस्पर विकली. देशमुख यांनी या व्यवहाराचं खरेदीखतही केलं नाही. याच प्रकरणावरून अधिकाऱ्याने बाबाराजे यांना जाब विचारला असता त्यांनी अधिकाऱ्याला ७० लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने या प्रकरणाची मावळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बाबाराजे देशमुख यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

मावळ पोलिसांनी बाबाराजे देशमुख यांच्याविरोधात कलम ३८६, ३८७, ४०६ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मावळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहे. बाबाराजे देशमुख हे कट्टर शिवभक्त असून त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक असल्याने त्यांचा पुणे जिल्ह्यासह राज्यात मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळं आता मावळातील खंडणी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

पुढील बातम्या