मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Modi on Mumbai : दिल्ली, महाराष्ट्र अन् मुंबईत एकच सरकार हवं, मोदींनी फुंकला BMC निवडणुकीचा शंख

Modi on Mumbai : दिल्ली, महाराष्ट्र अन् मुंबईत एकच सरकार हवं, मोदींनी फुंकला BMC निवडणुकीचा शंख

Jan 19, 2023, 08:01 PM IST

  • PM Narendra Modi on BMC : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी मुंबई महापालिकेचा शंखनाद फुंकताना म्हटलं की, दिल्ली-महाराष्ट्र व मुंबईतही एकच सरकार हवं. डबल इंजिन सरकारमुळे विकासाकामे जलद होतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi on BMC : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी मुंबई महापालिकेचा शंखनाद फुंकताना म्हटलं की, दिल्ली-महाराष्ट्र व मुंबईतही एकच सरकार हवं. डबल इंजिन सरकारमुळे विकासाकामे जलद होतात.

  • PM Narendra Modi on BMC : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी मुंबई महापालिकेचा शंखनाद फुंकताना म्हटलं की, दिल्ली-महाराष्ट्र व मुंबईतही एकच सरकार हवं. डबल इंजिन सरकारमुळे विकासाकामे जलद होतात.

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात करत मोदींनी मुंबई पालिका निवडणुकीचा शंखनाद केला आहे. मोदी म्हणाले की, डबल इंजिन सरकारमुळे देशाबरोबर महाराष्ट्र व मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी बीकेसी येथे आयोजित सभेत शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रदान मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं.

मोदी म्हणाले की, एनडीए सरकार कधी विकासापुढे राजकारण आणत नाही. विकास आमच्यासाठी प्राधान्य आहे. आम्ही कधी विकासाला ब्रेक लावला नाही. परंतु आम्ही मुंबईत आम्हाला अडचणी आल्या. आज १ लाखाहून अधिक फेरिवाल्यांच्या खात्यात पैसै जमा झाले. हे काम खूप आधीच व्हायला हवे होते. परंतु काही काळ डबल इंजिन सरकार नसल्याने प्रत्येक कामात अडथळे आणले गेले. त्यामुळे लाभार्थ्यांचे नुकसान झाले. दिल्लीपासून मुंबईपर्यंत एकच सत्ता असेल तर विकासात अडथळा येणार नाही. असे म्हणत मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल फुंकले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी काम सुरू आहे. याचा मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील फायदा होत आहे. डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि त्याच विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे, जो कधी केवळ श्रीमंत व्यक्तींना मिळत होता. यासाठी आज रेल्वे स्थानकांनाही विमानतळांच्या धर्तीवर विकसित केलं जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील पुनर्विकास केला जाणार आहे.

महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात आहे. यामध्ये शिंदे गट व भाजपने आघाडी घेतली आहे. याचीच एक झलक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याउपस्थितीत आज मुंबईत ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे.

पुढील बातम्या