मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Video : सोलापुरात विडी कामगारांना घराची चावी देताना पंतप्रधान मोदी असे झाले भावूक

Video : सोलापुरात विडी कामगारांना घराची चावी देताना पंतप्रधान मोदी असे झाले भावूक

Jan 19, 2024, 04:48 PM IST

  • सोलापूरमध्ये आज Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत १५ हजार विडी कामगार लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाषण करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.

PM Modi gets emotional discussing PMAY-Urban houses completion in Maharashtra. (Photo: ANI)

सोलापूरमध्ये आज Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत १५ हजार विडी कामगार लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाषण करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.

  • सोलापूरमध्ये आज Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत १५ हजार विडी कामगार लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाषण करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापुरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. मोदींनी यावेळी सोलापुरातील रायनगर हाऊसिंग सोसायटीत बांधण्यात आलेल्या १५ हजार घरांचे लोकार्पण केले. विडी कामगारांसाठी Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत ही घरे बांधण्यात आली आहे. ही घरे शहरातील हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचक, विडी कामगार, चालक अशा लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी राज्यात दोन हजार कोटी रुपयांच्या आठ अमृत (अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन) प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाषण करताना मोदी भावूक झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते.

महत्त्वाची आहे. विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे. त्यासाठी सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांची भूमिका खूप मोठी आहे. त्याकरिता अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठी आशा वाढल्या आहेत. अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्रक्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे श्री. मोदी यांनी सांगितले.

गेल्या ९ वर्षात २५ कोटी नागरिक गरीबीतून बाहेर

यावेळा मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. कोणत्याही मध्यस्थांशिवाय या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना झाल्याचे मोदी म्हणाले. गेल्या १० वर्षात ३० लाख कोटी रुपयांची रक्कम गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली असून केंद्राची जनधन योजना, आधार आदीद्वारे १० कोटी बोगस लाभार्थ्यांना हटविण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली.

संपूर्ण देशात आत्तापर्यंत ४ कोटी नागरिकांना पक्के घरे, १० कोटी शौचालये बांधून गरिबांना सुपूर्द करण्यात आल्याचं ते म्हणाले. देशात गोरगरिबांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना पुढील पाच वर्षेही सुरू राहिल, याचा पुनरुच्चार केला.

‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना राबवल्यामुळे देशभरात कोठेही गेल्यास संबंधित गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य मिळण्याची सोय केली जात असल्याचेही मोदी म्हणाले.

केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत भिवंडी निजामपूर, सांगली, उल्हासनगर व कल्याण -डोंबिवली या महापालिका तर शेगाव, सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण १ हजार २०१ कोटी रुपयाच्या खर्चाच्या पाणी पुरवठा व मलनिसारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी ऑनलाइन करण्यात आले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या