मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST Bus Accident : गणेशभक्तांच्या वाहनाला भीषण अपघात; २० प्रवासी बालंबाल बचावले, एकाचा मृत्यू

ST Bus Accident : गणेशभक्तांच्या वाहनाला भीषण अपघात; २० प्रवासी बालंबाल बचावले, एकाचा मृत्यू

Sep 17, 2023, 09:28 AM IST

    • ST Bus Accident : कोकणातील माणगावनजीक एसटी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
ST Bus Accident On Mumbai Goa Highway (HT)

ST Bus Accident : कोकणातील माणगावनजीक एसटी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

    • ST Bus Accident : कोकणातील माणगावनजीक एसटी बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

ST Bus Accident On Mumbai Goa Highway : गणेश चतुर्थीसाठी असंख्य चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. रेल्वे, एसटी बस आणि खाजगी गाड्या कोकणाच्या दिशेने निघालेल्या आहे. गणेशोत्सव जवळ येत असतानाच आता कोकणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. माणगाव नजीक एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अन्य २० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव एसटी बसने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव नजीक आज पहाटे चार वाजेच्या सुमारास राज्य महामंडळाच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे.

अपघातग्रस्त एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावरून राजापुरकडे जात होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. एसटी बसच्या अपघातामुळं मुंबई गोवा महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी बस मार्गावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कोकणात एका एसटी बसला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आता माणगाव नजीक पुन्हा एकदा एसटी बसचा अपघात झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या