मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohini Khadse : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड, शरद पवार गटाकडून नियुक्ती

Rohini Khadse : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड, शरद पवार गटाकडून नियुक्ती

Aug 29, 2023, 05:32 PM IST

  • Rohini Khadse NCP : राष्ट्रवादीच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून ही घोषणा करण्यात आली.

Rohini Khadse

RohiniKhadse NCP : राष्ट्रवादीच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून ही घोषणा करण्यात आली.

  • Rohini Khadse NCP : राष्ट्रवादीच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून ही घोषणा करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

रोहिणी खडसे या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या. रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांना ओळखले जाते. रोहिणी खडसे यांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

 

बीडमधील बबन गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बबन गिते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश केला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या