मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Feb 10, 2024, 10:48 AM IST

  • Chhagan Bhujbal receives threat letter: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी त्यांच्या नाशिक कार्यालयात धमकीचे पत्र मिळाले आहे. 

NCP leader Chhagan Bhujbal receives threat letter at his Nashik office. (HT_PRINT)

Chhagan Bhujbal receives threat letter: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी त्यांच्या नाशिक कार्यालयात धमकीचे पत्र मिळाले आहे.

  • Chhagan Bhujbal receives threat letter: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी त्यांच्या नाशिक कार्यालयात धमकीचे पत्र मिळाले आहे. 

NCP Leader Chhagan Bhujbal Received  Threat Letter: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. या घटनेनंतर भुजबळांच्या समर्थकांकडून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. गेल्या महिन्यात भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आपल्याच सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. कुणबी हे ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्यास पात्र असल्याने मराठा समाजाला ओबीसी कोट्यात मागच्या दाराने प्रवेश देण्याचा सरकारचा निर्णय असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करणारी मसुदा अधिसूचना काढल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारवर भुजबळांनी हल्ला चढवला.

“मी गेल्या ३५ वर्षांपासून ओबीसींसाठी काम करत आहे. आज मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला जात आहे. उद्या पटेल, जाट आणि गुर्जरांचाही समावेश होईल. अशा प्रकारे कोणताही समाज ओबीसी प्रवर्गात प्रवेश करेल. लोकशाहीत जी अपेक्षा करता येईल, त्या पद्धतीने आम्ही लढू. मराठा मागास नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे,” असे भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर महिन्यात भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नसून इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचे भुजबळ यांनी आपल्या एका सभेत सांगितले.

Raj Thackeray : …मग हेच औदार्य दाखवत बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

दरम्यान, सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट व्हावा, यासाठी आंदोलन करीत आहे.

छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आहेत. भुजबळ हे शिवसेनेचे प्रभावी नेते होते आणि तीस वर्षांपूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष सोडला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या