मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जरांगे पाटलांनी औकात ओळखावी, मी त्यांना मराठ्यांचा नेता मानत नाही; नारायण राणेंची जहरी टीका

जरांगे पाटलांनी औकात ओळखावी, मी त्यांना मराठ्यांचा नेता मानत नाही; नारायण राणेंची जहरी टीका

Feb 14, 2024, 02:32 PM IST

  • Narayan Rane attacks Manoj Jarange Patil : नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ न देण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

Narayan Rane attacks Manoj Jarange Patil

Narayan Rane attacks Manoj Jarange Patil : नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ न देण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

  • Narayan Rane attacks Manoj Jarange Patil : नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ न देण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

Narayan Rane Warns Manoj Jarange Patil : ‘मनोज जरांगे पाटलाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. मी त्याला मराठ्याचा नेता मानत नाही, त्यानं आपली औकात ओळखावी,' अशी जहरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनं अलीकडंच अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाचं अद्याप कायद्यात रूपांतर करण्यात आलेलं नाही. तसंच, अधिवेशन घेण्यासही चालढकल केली जात असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. त्याचा निषेध म्हणून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली असून राज्यात नरेंद्र मोदींच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

जरांगे पाटील यांच्या या भूमिकेनंतर भाजपमध्ये अस्वस्थता आहे. नारायण राणे यांनी भाजपच्या वतीनं ‘एक्स’वर पोस्ट लिहून जरांगे पाटलांना उत्तर दिलं आहे. त्यांनी जरांगे पाटलांवर एकेरी शब्दात जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

'मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाला आहे. तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्यानं केली. त्‍यानं आता मर्यादा ओलांडली आहे, असं राणेंनी म्हटलं आहे.

‘माननीय पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरून हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत,’ असा इशाराही नारायण राणे यांनी जरांगेंना दिला आहे. नारायण राणे यांच्या या ट्वीटमुळं आता वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

राणेंचा जरांगेंच्या भूमिकेला सुरुवातीपासूनच विरोध

नारायण राणे यांनी सुरुवातीपासून कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे. आम्ही कुणबीतून आरक्षण घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून मराठा आंदोलक आणि त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. राज्य सरकार किंवा पक्ष पातळीवरून नारायण राणेंच्या भूमिकेला कुठलाही दुजोरा मिळाला नव्हता. उलट मुंबईच्या दिशेनं आलेल्या मराठा मोर्चाच्या मागण्या मान्य सरकारनं मान्य केल्या. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा शब्दही दिला.

राणेंच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया

नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या पोस्टवर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नारायण राणे यांनी मराठा समाजासाठी आजवर काय केलं? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. नारायण राणे हे उद्या मायावतींच्या पक्षात जायलाही कमी करणार नाहीत, अशाही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

पुढील बातम्या