मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Nana Patole : नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा, छोट्या कार्यकर्त्यांसारखे वागू नका; नाना पटोले संजय राऊतांवर भडकले

Nana Patole : नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा, छोट्या कार्यकर्त्यांसारखे वागू नका; नाना पटोले संजय राऊतांवर भडकले

Apr 07, 2024, 12:56 PM IST

    • Nana Patole on Sanjay Raut : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तू तू मै मै पाहायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024) सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांनी टीका केल्यावर या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा, छोट्या कार्यकर्त्यांसारखे वागू नका; नाना पटोले संजय राऊतांवर भडकले

Nana Patole on Sanjay Raut : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तू तू मै मै पाहायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024) सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांनी टीका केल्यावर या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

    • Nana Patole on Sanjay Raut : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तू तू मै मै पाहायला मिळत आहे. (Lok Sabha Election 2024) सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांनी टीका केल्यावर या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

Nana Patole on Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतांना महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तू तू-मैं मैं सुरू आहे. नाना पटोले यांनी संजय राऊतांवर टीका केली असून त्यांनी आता नौटंकी थांबवावी तसेच मर्यादा पाळावी आणि लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करुने थांबवावे असे उत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

England woman murder : माणूस नाही राक्षस! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले २०० तुकडे; कुत्र्याला ओव्हनमध्ये टाकून जाळले

संजय राऊत यांनी शनिवारी झालेल्या एका सभेत कॉँग्रेसवर टीका केली होती. यावेळी संजय राऊत यांनी सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण राज्यात त्यांची कोंडी करू, असे वक्तव्य केले होते. यातून त्यांनी भाजप उमेदवार संजयकाका पाटील व काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधतांना म्हटले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Gujarat University : गुजरात विद्यापीठात पुन्हा राडा! नमाज पठणानंतर ७ अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश

नाना पटोले संजय राऊत यांच्या टीकेवर उत्तर देतांना म्हणाले, देशात लोकशाहीच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या विरोधात आम्ही लढत आहोत. भाजप सत्येत यायला नको, यासाठी सर्व परिणाम भोगायला तयार असून आमची भूमिका देखील स्पष्ट आहे. असे असतांना त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करणे म्हणजे न पटण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांनी आता सुधारणा करणे गरजेचे आहे. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका असून एखाद्या मोठ्या नेत्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. संजय राऊतांनी आता नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये. दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू असे देखील पटोले म्हणाले.

खडसे भाजपत जातील असे वाटत नाही: पटोले

एकनाथ खडसे यांच्या बद्दल बोलतांना पटोले म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये जाईल असे वाटत नाही. खडसे स्वाभिमानी नेते आहे, त्यांचा भाजपमध्ये ज्याप्रकारे छळ झाला, तो पाहता ते परत भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतील असे वाटत नाही. एकनाथ शिंदे मात्र भाजपच्या वाटेवर आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

पुढील बातम्या