Gujarat University news : गेल्या महिन्यातच काही परदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या आवारात खुल्या जागेत नमाज पठण केल्याने गोंधळ उडाला होता. या वरुण बाहेरून आलेल्या २०-२५ जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण करून विद्यापीठात तोडफोड केली होती. ही घटना ताजी असतांना, काल रात्री पुन्हा विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज पठण करण्यावरून राडा झाला आहे.
उघड्यावर नमाज पठण केल्यावर परदेशी विद्यार्थ्यांशी झालेल्या भांडणानंतर ७ अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. या बाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, यातील ५ विद्यार्थ्यांनी यापूर्वीच वसतिगृह सोडले आहे. गेल्या महिन्यातच काही परदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या आवारात उघड्यावर नमाज पठण केल्याने गोंधळ झाला होता. यावेळी बाहेरून आलेल्या २०-२५ जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण करून तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांविरुद्ध एफआयआरही दाखल केली होती. हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पोहोचले होते, त्यानंतर अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळानेही विद्यापीठाला भेट दिली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह रिकामे करण्यास सांगितले आहे त्यांनी एकतर त्यांचा अभ्यास पूर्ण केला आहे किंवा फक्त काही औपचारिकता बाकी आहेत ज्यासाठी त्यांना वसतिगृहात राहण्याची आवश्यकता नाही. विद्यापीठाच्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम संपल्यानंतर वसतिगृहाची सुविधा वापरता येत नाही. ज्या ७ विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले आहे, ते सर्व या वर्गात मोडतात. गुजरात विद्यापीठात सध्या सुमारे १८० परदेशी विद्यार्थी आहेत.
विद्यापीठाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काही ना काही कारणाने वसतिगृहात राहिले आहेत. तसेच वसतिगृह सोडण्यास उशीर केला आहे. अशी प्रकरणे पाहता त्याविरोधात कठोर नियम लागू करण्याच्या विचारात विद्यापीठ आहे.
यावेळी माहिती देताना गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. निरजा गुप्ता म्हणाल्या, सात पैकी पाच विद्यार्थी आधीच वसतिगृह सोडले आहेत. उर्वरित दोन विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या