पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचयारांच्या घटनेत वाढ झाली आहे. रोज अत्याचाराच्या तक्रारी दाखल होत आहे. अशीच एक घटना पुन्हा उघडकीस आली असून एकाने आपल्या पत्नीच्या मदतीने १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही आरोपी महिलेच्या ओळखीची असून तिने तिला वडापाव खाण्याच्या बहण्याने घरी बोलावले. यानंतर काही कामानिमित्त घराबाहेर जाण्याच्या बहाण्याने तिने बाहेरून घराची कडी लाऊन घेतली. या दरम्यान, आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना कात्रज येथे ३ मार्च रोजी घडली असून या प्रकरणी शनिवारी तक्रार देण्यात आली.
प्रल्हाद सखाराम साळुंके आणि त्याच्या पत्नीवर या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही भाजी मंडईतून जात होती. यावेळी तिच्या ओळखीची असलेली आरोपी महिला ही तिला वाटेत भेटली. महिलेने तरुणीला वडापाव खाण्यासाठी घरी येण्याचा आग्रह धरला. तरुणी ही तिच्या घरी गेली. यानंतर थोड्या वेळ बोलून काही कामाच्या निमित्ताने महिला ही घराबाहेर गेली.
मात्र, जाताना तिने घराची कडी बाहेरून बंद केली. यानंतर प्रल्हाद साळुंखे याने पीडित तरुणी घरी एकटी असतांना तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याला विरोध केला. तसेच घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाजा बंद असल्याने तिला बाहेर पडता आले नाही. त्यानंतर तरुणीला धमकावत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचारानंतर पीडित तरुणीने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणी दोन्ही पती पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढल्या आहे. काही दिवसांपूर्वी एका पतीने आपल्या पत्नीची विक्री करून तिच्यावर अत्याचार केले होते. तर एका तरुणीला दोघांनी लग्नाला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले होते. या वाढत्या घटना अद्याप कमी झालेल्या नाहीत. या घटनांवर जरब बसवण्यात पोलिस प्रशासन देखील अपयशी ठरले आहे.
संबंधित बातम्या