England woman murder : इंग्लंडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका २८ वर्षीय पतीने आपल्या पत्नीला चाकूने भोसकून मारले. यानंतर त्याने क्रोर्याची परिसीमा गाठली. त्याने त्याच्या पत्नीच्या शरीराचे तब्बल २०० तुकडे केले. यानंतर तिच्या आवडत्या कुत्र्याला ओव्हनमध्ये टाकून जीवंत जाळले. आरोपीने जवळपास आठवडाभरात शरीराचे तुकडे स्वयंपाकघरात फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर मित्राच्या मदतीने त्याने तिच्या शरीराचे तुकडे हे नदीत फेकून दिले. या साठी त्याने मित्राला ५० पौंड दिले.
इंग्लंडमधील २८ वर्षीय निकोलस मेटसनने शुक्रवारी त्याची २६ वर्षीय पत्नी होली ब्रेमलीची हात्या केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नी कुठे आहे असे विचारले. यावर त्याने गमतीने सांगितले की, ती पलंगाखाली लपली असावी.
मेटसनने बेडरुममध्ये पत्नीवर अनेक वेळा चाकूने वार केले. यानंतर तिचा मृतदेह त्याने बाथरूममध्ये नेला. या ठिकाणी त्याने तिच्या शरीराचे २०० हून अधिक तुकडे केले. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकले आणि स्वयंपाकघरात फ्रीजमध्ये लपून ठेवले. या घटनेनंतर सुमारे आठवडाभर पोलीस त्याच्या घरी तपासासाठी पोहोचले. दरम्यान, त्याने आपल्या मित्राला पत्नीच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी ५० पाउंड दिले.
मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला निघालेल्या एका व्यक्तीला विथम नदीत प्लास्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसल्या. एका पिशवीत मानवी हात आणि दुसऱ्यामध्ये ब्रॅमलीचे मुंडके होते. ही घटना पोलिसांना करळवण्यात आली. पोलिसांनी डायव्हर्सच्या मदतीने नदीत शोध घेतला असता मृतदेहाचे२२४ तुकडे सापडले. यातील काही तुकडे अद्याप सापडले नाहीत.
ब्रॅमलीच्या आईने कोर्टात सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न होऊन फक्त १६ महिने झाले होते. या काळात आरोपीने टीला तिच्या कुटुंबीयांना अनेक वर्षांपासून भेटू देखील दिले नाही. दोघांत मोठ्या प्रमाणात भांडणे होत असल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या पूर्वीच मुलीची हात्या करण्यात आली.
ब्रॅमली एकदा तिच्या घरातून पळून गेली होती. यावेळी तिने थेट पोलिसांची मदत मागितली होती. आरोपी पतीने तिच्या पाळीव कुत्र्याला मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये टाकून मारले होते.
२४ मार्च रोजी लिंकनशायर पोलीस तपासासाठी जोडप्याच्या घरी पोहोचले. मेटसनने दार उघडले. मात्र, त्याने कांगावा करत तो पत्नीच्या कौटुंबिक अत्याचाराचा बळी असल्याचा आरोप केला. त्याने पोलिसांना त्याच्या हातावर पत्नीने चावा घेतल्याचे चिन्ह दाखवले.
पोलिसांना बाथटबमध्ये रक्ताने माखलेले चादरी आढळल्या आहेत. तर घरभर अमोनिया आणि ब्लीचचा तीव्र वास देखील आला. मेटसनने नंतर पोलिसांना सांगितले की त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी महिला समर्थन गटासह गेली होती. मारेकऱ्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.