मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aashadhi Wari 2023 : मुस्लिम कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा, शिरखुर्म्याचं वाटप करत दिला प्रेमाचा संदेश

Aashadhi Wari 2023 : मुस्लिम कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा, शिरखुर्म्याचं वाटप करत दिला प्रेमाचा संदेश

Jun 19, 2023, 04:55 PM IST

    • Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीला वारकऱ्यांची मदत करण्यासाठी असंख्य हात पुढे सरसावत आहे. संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना प्रेमाने शिरखुर्म्याचं वाटप केलं आहे.
Aashadhi Wari 2023 (HT)

Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीला वारकऱ्यांची मदत करण्यासाठी असंख्य हात पुढे सरसावत आहे. संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना प्रेमाने शिरखुर्म्याचं वाटप केलं आहे.

    • Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीला वारकऱ्यांची मदत करण्यासाठी असंख्य हात पुढे सरसावत आहे. संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना प्रेमाने शिरखुर्म्याचं वाटप केलं आहे.

Aashadhi Wari 2023 Inspirational Stories : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना समोर येत असताना संभाजीनगरमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्यांना मुस्लिम कुटुंबियांनी शिरखुर्मा देत सेवा करण्याचं काम केलं आहे. पैठण तालुक्यातील कुरणपिंप्री गावातील मुख्याध्यापक अय्युब उस्मान शेख यांनी हा प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. त्यामुळं आता त्यांचं राज्यभरातून कौतुक केलं जात आहे. गेल्या १४ वर्षांपासून ते वारकऱ्यांची सेवा करत समाजात एकोपा आणि शांततेचा संदेश देत आहे. त्यांनी सेवा केल्याने अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रेमाचा संदेश दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मगाव असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथून दरवर्षी हभप दिनकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी निघत असते. पंढरपुरच्या दिशेने निघाल्यानंतर कुरणपिंप्रीमार्गे दिंडी बीड जिल्ह्यात प्रवेश करते. यावेळी गावातील झेडपी शाळेचे मुख्याध्यापक अय्युब शेख हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी भोजन आणि पौष्टिक शिरखुर्म्याची व्यवस्था करत असतात. गावातच वारकऱ्यांचा मुक्काम होणार असल्याने मुस्लिम कुटुंबियांकडून दिंडीचे जंगी स्वागत केले जाते. यावेळी दिंडीत १०० ते १५० च्या संख्येने वारकरी उपस्थित असतात. वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर अय्युब शेख हे दोन्ही समाजातील जेष्ठांशी संवाद साधतात. वारकऱ्यांकडूनही त्यांना नेहमीच सहकार्य करण्यात येतं. त्यामुळं या सकारात्मक बातमीचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

वारकऱ्यांना पंढरपुरात पोहचण्यासाठी शेकडो किमी अंतर चालावं लागतं. त्यामुळं आम्ही त्यांना ऊर्जा देणारा शिरखुर्मा देण्याचं काम करत असल्याचं अय्युब शेख यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही इस्लाम धर्माला मानत असलो तरी पैगंबरांनी मानवतेची शिकवण दिलेली आहे. वारकरी पंथात मोहम्मद शेख यांच्यासारखे संत होऊन गेलेत. वारकऱ्यांची सेवा केल्याने आत्मिक आनंद आणि समाधान मिळतो, असंही मुख्याध्यापक अय्युब शेख यांनी म्हटलं आहे. मुस्लिम कुटुंबाने मोठ्या प्रेमाने आणि आदराने सेवा केल्याने दिंडीतील काही वारकरी भारावून गेले होते. त्यामुळं आता देशभरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना पैठणमध्ये एकतेचा संदेश देणाऱ्या घटनेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

पुढील बातम्या