मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. घरात घुसून चोराचा मायलेकीवर कोयत्याने हल्ला, महिलेचा मृत्यू; मुरबाडमधील घटना

धक्कादायक.. घरात घुसून चोराचा मायलेकीवर कोयत्याने हल्ला, महिलेचा मृत्यू; मुरबाडमधील घटना

Feb 16, 2023, 11:26 PM IST

  • मुरबाडमध्ये चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या आरोपीने भरदुपारी महिला व सात वर्षीय मुलीवर कोयत्याने हत्या केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली आहे.

घरात घुसून चोराचा मायलेकीवर कोयत्याने हल्ला

मुरबाडमध्ये चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या आरोपीने भरदुपारी महिला व सात वर्षीय मुलीवर कोयत्याने हत्या केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली आहे.

  • मुरबाडमध्ये चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या आरोपीने भरदुपारी महिला व सात वर्षीय मुलीवर कोयत्याने हत्या केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली आहे.

बदलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून मायलेकीवर कोयत्याने हल्ला करत महिलेची निर्घृण हत्या केली. ही घटना मुरबाड तालुक्यातील साजई गावात घडली आहे. या हल्ल्यात सात वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोर फरार झाला आहे. या घटनेने मुरबाडमध्ये खळबळ उडाली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजई गावात शेखर बांगर कुटूंबासह रहात आहेत. गुरुवारी ते कामानिमित्त घराबाहेर गेले होते. यावेळी घरी बांगर यांच्या पत्नी चंदना बांगर आणि मुलगी श्रावणी दोघीच घरात होते. दुपारच्या वेळेस एक अज्ञात व्यक्ती बांगर यांच्या घरात घुसला. त्याने कोयत्याचा धाक दाखवत चंदना यांच्याकडे सोनं आणि दहा हजार रुपयांची मागणी केली. 

चंदना बांगर यांनी पैसे व दागिने देण्यास विरोध केल्याने आरोपीने चंदना यांच्यावर कोयत्याने वार केले. यावेळी त्यांची सात वर्षाची मुलगी श्रावणी ही आईला वाचवण्यासाठी आली असता आरोपीने तिच्यावरही कोयत्याने वार केले व तेथून पळून गेला. या हल्ल्यात चंदना बांगर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या