मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune express way : वेगाला वेसण! मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वेगमर्यादा ओलांडल्यास थेट २ हजार रुपयांचा दंड

Mumbai Pune express way : वेगाला वेसण! मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वेगमर्यादा ओलांडल्यास थेट २ हजार रुपयांचा दंड

Mar 07, 2024, 02:06 PM IST

  • Mumbai Pune express way Speed limit : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता प्रत्येक दोन किमी अंतरावर सीसीटीव्ही (CCTV) बसवण्यात आले असून १०० वेग मर्यादा (Speed Limit) ओलांडणाऱ्या वाहनांना या माध्यमातून दंड ठोठावला जाणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर १०० ची वेगमर्यादा ओलांडल्यास २ हजाराचा दंड

Mumbai Pune express way Speed limit : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता प्रत्येक दोन किमी अंतरावर सीसीटीव्ही (CCTV) बसवण्यात आले असून १०० वेग मर्यादा (Speed Limit) ओलांडणाऱ्या वाहनांना या माध्यमातून दंड ठोठावला जाणार आहे.

  • Mumbai Pune express way Speed limit : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता प्रत्येक दोन किमी अंतरावर सीसीटीव्ही (CCTV) बसवण्यात आले असून १०० वेग मर्यादा (Speed Limit) ओलांडणाऱ्या वाहनांना या माध्यमातून दंड ठोठावला जाणार आहे.

Mumbai-Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या मार्गावर आता १०० ची वेगमर्यादा ओलंडल्यास थेट २ हजार रुपयांचा ऑनलाइन दंड आकरण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावर प्रत्येक दोन किमी अंतरावर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून या माध्यमांतून वेगाने जाणाऱ्या वाहनांनावर आता नजर ठेवली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

बेळगावात नेपाळी पैलवानाची 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, आयोजकांनी माईक हिसकावून दम दिला

मुंबई पुणे एक्सप्रेसवे रोज हजारो वाहने जात असतात. यात कार, बस आणि अजवड वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गावर अनेक वाहने ही वेगमर्यादा पाळत नाहीत. या मार्गावर काही ठिकाणी १०० किमी पेक्षा आत वेगमर्यादा बंधनकारक आहे. मात्र, ही वेग मर्यादा पाळली जात नाही. उलट १०० किमी पेक्षा अधिक वेगाने ही वाहने चालवली जातात. यामुळे या मार्गावर आपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Sanjay Raut news : आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे; संजय राऊत यांचा आंबेडकरांना सल्ला

दरम्यान, अशा बेजबादार वाहनचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता या मार्गावर सिसिटीव्ही बसवण्यात आले आहे. दर दोन किमी अंतरावर हे सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या द्वारे १०० किमी पेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार आहे. येथे असणारी स्पीड गण वाहनांचा वेग तपासून १०० किमी पेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरुन थेट चलन पाठवणार आहेत. वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्यांना २ हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे या मार्गावर आता वेग मर्यादेचे बंधन पाळावे लागणार आहेत.

पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर सध्या गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. या मार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाय योजना सुरू आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या