मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai threat message : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब! वाहतूक पोलिसांना मेसेजवरुन धमकी; यंत्रणा सतर्क

Mumbai threat message : मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब! वाहतूक पोलिसांना मेसेजवरुन धमकी; यंत्रणा सतर्क

Feb 02, 2024, 10:00 AM IST

    • Mumbai threat message : मुंबईत तब्बल सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा धमाका होणार असल्याचा मेसेज वाहतूक पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
Mumbai Police (PTI)

Mumbai threat message : मुंबईत तब्बल सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा धमाका होणार असल्याचा मेसेज वाहतूक पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

    • Mumbai threat message : मुंबईत तब्बल सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा धमाका होणार असल्याचा मेसेज वाहतूक पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Mumbai police : मुंबईत तब्बल सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा धमाका होणार आहे असा धमकीवजा मेसेज मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज आला आहे. या पूर्वी बुधवारी देखील असाच मेसेज आला होता. दरम्यान, या धमकीमुळे पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल असून त्याचा शोध घेतला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

worli bandra sea link : वरळी-वांद्रे सीलिंकमध्ये दुचाकी घालून महिलेचा धुडगूस; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना

मुंबईत गेल्या काही दिवसांपासूंन धमकीचे मेसेजेस येण्याचे प्रमाण वाढले आहे. यातुन घातपात करण्याच्या धमक्या देण्यात येतात. आज देखील मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेसेज पाठवला असून मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा धमाका होणार असल्याचे त्याने मेसेजमध्ये म्हटले आहे. ही माहिती वाहतूक पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली असून त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

helmet compulsion in pune: पुण्यात आता हेल्मेट सक्ती! पदभार घेताच नवीन आयुक्तांनी दिला 'हा' इशारा

मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाईन नंबर असलेल्या व्हाट्सअपवर हा मेसेज आला. यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी काही महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी देखील करण्यात आली आहे, मात्र कुठेही काहीही आढळून आले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांना देखील गुरुवारी रात्री याच प्रकारचा धमकीचा मेसेज आला होता. यात पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवून तपासणी करण्यात आली होती. तपसात काहीही आढळून आलेले नाही.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या