helmet compulsion in pune say new CP Amitesh kumar: पुणेकरांनी हेल्मेटसक्तीला नेहमी विरोध केला आहे. या पूर्वी अनेकदा हेल्मेटसक्तीवरुन पुण्यात आंदोलने झाली. मात्र, हेल्मेट सक्ती करण्याचा प्रयत्न पुणेकरांनी हाणून पाडला. मात्र, आता पुन्हा पुन्हात पुन्हा हेल्मेट सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. गुरुवारी पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हेल्मेट घालणे हा कायदा असून त्याचे पालन झाले पाहिजे असे म्हणत हेल्मेट सक्तीचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे भविष्यात आता पुणेकरांना हेल्मेट सक्तीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली करण्याचे आदेश गृह विभागाने बुधवारी सायंकाळी दिले. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तपदी कोकण परीक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण पावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासूंन अपघात वाढले आहे. पुण्यातही अपघात वाढले आहे. यात हेल्मेट नसल्याने मृत्यूमुखी पडलेलेल्यांची मोठी संख्या आहे. हे वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हेल्मेट घालणे हा कायदा केला आहे. मात्र, पुण्यात हेल्मेट सक्तीला नेहमी विरोध झाला आहे. या विरोध पुणेकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. मात्र, नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याचे सांगितले असल्याने आत पुणेकर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुण्यात गेला काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. ही गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान अमितेश कुमार यांच्या समोर राहणार आहे. या बाबत अमितेश कुमार म्हणाले, पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले हे प्राधान्य राहणार आहे. या साठी बेसिक पोलिसिंग, व्हिजीबल पोलिसिंग, लॉ अँड ऑर्डर यावर विशेष दिला जाणार आहे. वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ञ पोलिसांचे पथक तयार करणे आणि वाढत्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील पुण्यात कायदा आणि सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे अमितेश कुमार म्हणाले.
पुण्यात वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या झाली आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी विशेष उपाय करण्यात येणार आहे. दरम्यान, वाहतूक कोंडीला वैतागलेल्या पुणेकरांची आगामी काळात खरंच सुटका होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.